निरगुडसर: खो-खो खेळाचा मागमूसही नसताना रांजणी सारख्या खेड्यात गेल्या २१ वर्षात २ आंतरराष्ट्रीय व १०७ राष्ट्रीय खेळाडू घडवण्याची किमया संदीप निवृत्ती चव्हाण या उपशिक्षकाने करून दाखवली आहे.रांजणी सारख्या खेड्यात नरसिंह क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खो खोची पंढरी उभारत खो खो खेळाचा जोरावर १८ खेळाडू सरकारी सेवेत रुजू झाले असून नरसिंह क्रीडा मंडळाचे नाव देशात ओळखले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील रांजणी(ता.आंबेगाव)येथील रयत शिक्षण संस्थेचे नरसिंह विद्यालय व ज्युनि कॉलेज ऑफ कॉमर्स येथे उपशिक्षक म्हणून संदीप चव्हाण यांची २००२ साली नियुक्ती झाली,त्यावेळी शाळेत खो-खो खेळाचा साधा मागमूस ही नव्हता त्यावेळी हळू हळू खो खो खेळाची सुरुवात झाली पण खऱ्या अर्थाने सुरुवात २००६ साली झाली,रांजणी गावात नरसिंह क्रीडा मंडळ नावाने मोफत खो खो प्रशिक्षण केंद्र सुरु करुन नरसिंह क्रीडा मंडळ हे महाराष्ट्र खो खो असोसिएशनशी संलग्न केले,त्यानंतर प्रशिक्षक म्हणून मैदानावर खेळाचे धडे देणारे संदीप चव्हाण यांच्या कष्टाला खेळाडूंच्या मिळालेल्या जिद्द,चिकाटीच्या साथीमुळे खो खो खेळात नरसिंह क्रीडा मंडळाने घेतलेली भरारी खरोखर थक्क करणारी आहे,प्रशिक्षक आणि खेळाडू यांनी मागे वळून न पाहता यशाची शिखरे सर केल्याने शालेय व खो खो असोसिएशन स्पर्धेतून रांजणी सारख्या खेडे गावातून २ आंतरराष्ट्रीय व १०७ राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत,यामुळे नरसिंह क्रीडा मंडळाचे नाव देशात ओळखले जात आहे.
शालेय राज्यस्तरीय स्पर्ध्येत १६ वेळा विद्यालयाचे संघ प्रशिक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात प्रथम क्रमांकाने विजयी झाले आहेत.दोन वेळा खो खो असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो खो संघाचे प्रशिक्षक म्हणून संदीप चव्हाण यांची निवड होऊन सुवर्णपदक पटकावले आहे.नरसिंह क्रीडा मंडळाच्या ७ खेळाडुंना राष्ट्रीय खो खो स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणुन पुरस्कार मिळाले आहेत.खो खो खेळातून सुवर्ण पदके,बक्षिसे पटकावली,शिष्यवृत्ती मिळवली आणि याच खेळाच्या कोट्यातून तब्बल १८ खेळाडू शासकीय सेवेत नियुक्त झाले आहेत,विशेष म्हणजे शासकीय सेवेत रुजू झालेल्या १८ पैकी १४ मुलींचा समावेश आहे.पल्लवी वाघ (पोलिस उपनिरीक्षक),प्रणाली बेनके(पोलिस उपनिरीक्षक),नीलम वाघ (राज्य विक्रीकर निरीक्षक),भाग्यश्री जाधव (पोलिस उपनिरीक्षक),काजल जाधव(महसूल अधिकारी),प्रांजल जाधव (ठाणे शहर पोलिस) दिशा वाघ (ठाणे शहर पोलिस),तेजस्विनी मिंडे (रेल्वे पोलिस) काजल भोर (क्रीडा विभाग थेट नियुक्ती),त्रिवेणी निकम (आरोग्य अधिकारी),साक्षी वाघ (मुंबई पोलीस),ऋतुजा भोर (मुंबई पोलीस) प्रिया भोर ( मुंबई पोलीस), दिव्या विश्वासराव (मुंबई पोलीस),रुपेश वाघ (पिंपरी चिंचवड पोलीस) सूरज वाघ (मुंबई पोलीस)अभिजित उकिरडे (ठाणे पोलीस),मुकेश सोनवणे (नौदल).
ग्रामीण भागात अस्सल भारतीय मैदानी खेळ असलेल्या खो खो या खेळातील कामगिरीची दखल घेऊन विविध प्रकारच्या पुरस्काराने संदिप चव्हाण यांना गौरवण्यात आले आहे.सध्या संदीप चव्हाण हे रयत शिक्षण संस्थेचे,संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथे उपशिक्षक म्हणून जुलै 2023 पासुन कार्यरत आहेत.
चौकट:२) राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक व उपशिक्षक संदीप चव्हाण म्हणाले की,रांजणी सारख्या खेड्यात खो खो खेळाच्या माध्यमातून गेल्या २१ वर्षात २ आंतरराष्ट्रीय व १०७ राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत,आत्तापर्यंत त्यातील १८ खेळाडू खो खो कोट्यातून शासकीय सेवेत रुजू झाले असून त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे.खेळातील सातत्य आणि जिद्द,चिकाटीमुळे खेळाडूंना मोठे यश मिळाले आहे. फोटो.१)आयकार्ड संदीप चव्हाण,राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक. २)नरसिंह क्रीडा मंडळातील मुलींच्या खो खो संघासमवेत राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक संदीप चव्हाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.