Pune Municipal Corporation : महापालिकेची निर्मल वारी, अडीचशे टन कचऱ्याचे संकलन

यामध्ये सुमारे २५६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationesakal
Updated on

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाल्यानंतर लाखो वारकरी देखील शहराच्या बाहेर पडले. त्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासात महापालिकेच्या शाळा, मंदिरे, धर्मशाळा, रस्ते, उद्यानामध्ये स्वच्छता मोहीम सुरु केली. यामध्ये सुमारे २५६ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

Pune Municipal Corporation
Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’च्‍या एमबीए, बीसीएची सीईटी अर्जाची 13 पर्यंत मुदत

पुणे शहरात दोन दिवस संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी यांच्या पालखीचा मुक्काम होता. या दोन्ही पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाल्यापासून ते शहरातून बाहेर जाईपर्यंत स्वच्छतेवर भर देण्यात आला होता. नाना पेठ, भवानी पेठेत पालखीचा मुक्काम असल्याने तेथे पादुकांच्या दर्शनासाठी लाखो नागरिक आले. तेथे २४ तास ७०० कर्मचारी स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते.

Pune Municipal Corporation
Nashik Abduction News : युवतीचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न! देवळाली कॅम्पातील घटना

आज सकाळी दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. वारकऱ्यांचा मुक्काम पेठांमध्ये असल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयासह, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, हडपसर मुंढवा, रामटेकडी वानवडी या क्षेत्रीयकार्यालयांमध्ये रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चहाचे कप, पाण्याचे ग्लास, खाद्य पदार्थ, केळीचे साल यासह अन्य प्रकारचा कचरा झाडणकाम करून संकलित करण्यात आला.

महिला वारकऱ्यांसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये निवासाची व्यवस्था होती, तेथे मोफत सॅनिटरी नॅपकिन, हिरकणी कक्ष स्थापन केले होते. तेथील स्वच्छता करण्यात आली. दिंड्या पुढे गेल्यानंतर पेठांमधील रस्ते, लष्कर भागातील रस्ते, सोलापूर हडपसर रस्ता यासह अन्य भागात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये २५६ टन कचरा संकलित केला. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.