पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी केबलच्या साहाय्याने हवेत उडणारी कार, रोप वे तसेच ट्रॉली बसचा पर्याय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविला आहे. प्रत्यक्षात पुणे शहरात पायी चालत फिरणेदेखील मुश्कील बनले आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याचे सुरू झालेले काम अजूनही अपूर्णच आहे. कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या पुणे-सातारा रस्त्यावर त्रुटी आढळल्याने आता पुन्हा या रस्त्यावर काम केले जाणार आहे. याच्या ‘डीपीआर’ला देखील पुन्हा सुरुवात झाली. रिंगरोडचा प्रश्नदेखील असाच अर्धवट आहे. या स्थितीत पुण्यात हवेत उडणारी कार म्हणजे गडकरींनी हवेत बांधलेले आश्वासनांचे ‘इमले’ आहेत का? असा प्रश्न पडला आहे.
चांदणी चौक येथील वाहतूक कोंडी व पाडण्यात येणाऱ्या पुलाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतूक समस्यांबाबतीत विविध उपाय, संकल्पना मांडल्या. ज्या वस्तुस्थितीपासून कोसो दूर आहोत, अनेक आश्वासने हे स्वप्नवत असताना गडकरी यांनी कोणताही ठोस उपाय मांडला नाही.
गडकरींचा तिसऱ्यांदा वायदा!
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ ऑगस्ट २०१७ रोजी झाले, त्यावेळी त्यांनी या कामाच्या भूसंपादनाला वेग येऊन ते लवकर पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सुमारे अडीच वर्षे होते. त्यानंतर पुन्हा राज्यात भाजप आघाडीचे सरकार आले आहे. पुणे महापालिकाही तेव्हापासून भाजपच्याच ताब्यात आहे, तरीही चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामात फारशी प्रगती झालेली नाही. गडकरी यांनी १३ फेब्रुवारी २०२१ रोजी चांदणी चौकातील कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी हे काम एक वर्षांत पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. त्यालाही आता दीड वर्ष झाले आहे. तरीही उड्डाणपुलाचे काम अवघे ४० टक्केच पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी अजून एक वर्ष पुणेकरांना वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर वाहनाची संख्या वाढली, सेवारस्त्याबाबत काही सुधारणा करायच्या असल्याने पुन्हा एकदा डीपीआर करणार
पुणे-शिरूर-नगर-औरंगाबाद रस्त्यावर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत तीनमजली उड्डाणपूल होणार, त्याचे डिझाईनदेखील तयार झाले
पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे बंगळूर ते मुंबई साडेचार तास; तर पुणे-बंगळूर साडेतीन तास गाठणे शक्य होणार
पुणे व मुंबईतला ताण कमी करण्यासाठी सुरत ते चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉरचे काम सुरू
पुणे-औरंगाबाद रस्त्याचे जमीन हस्तांतराचे काम सुरू; पुण्यातील रिंगरोडसाठी सुमारे १३ हजार कोटींचा खर्च; केवळ जमीन हस्तांतर होणार, यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणदेखील स्वतःच्या खर्चाने काही रस्ते करणार
पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातांची संख्या कामी करण्यासाठी काही ठिकाणी उन्नत मार्ग, तर काही भुयारी मार्ग करणार हडपसर ते यवतदरम्यान उन्नत मार्ग करणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.