Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन या दोन्ही शहरांमधल्या प्रवासासाठी सध्या चार तासांचा वेळ लागतो.
Work on Pune-Satara highway stalled due to Axis Bank nitin Gadkari
Work on Pune-Satara highway stalled due to Axis Bank nitin Gadkari
Updated on

पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरुन या दोन्ही शहरांमधल्या प्रवासासाठी सध्या चार तासांचा वेळ लागतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानं कधी कधी यापेक्षा जास्त वेळ लागतो. पण आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळं या दोन शहरांमधील प्रवास हा खूपच कमी होणार आहे. केवळ दीड तासात मुंबई-पुणे प्रवास करता येणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी नव्या हायवेची माहिती दिली. डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Work on Pune-Satara highway stalled due to Axis Bank nitin Gadkari
IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे आम्ही बांधला तेव्हा आमच्याकडं पैसे नव्हते त्यामुळं तो आम्ही बीओटी तत्वावर अर्थात बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर बांधला. पण आता मध्यंतरी याच रस्त्यावर एवढी वाहतूक कोंडी झाली होती की त्याचदिवशी मी ठरवलं इथं नवीन रस्ता बांधायचा. त्यामुळं आता मुंबईला अटल सेतूवरुन उतरल्यानंतर तिथून पुण्याच्या रिंगरोड पर्यंत आणि तिथून थेट बंगळुरुपर्यंत ४५ हजार कोटी रुपयांचा नवीन हायवे बांधायच्या कामाची आम्ही सुरुवात केलेली आहे.

Work on Pune-Satara highway stalled due to Axis Bank nitin Gadkari
Nitesh Rane: नितेश राणेंच्या प्रक्षोभक विधानांना लागणार लगाम? राष्ट्रवादीची फडणवीसांकडं कडक कारवाईबाबत तक्रार

या हायवेच्या कामाचं पहिलं पॅकेज एक महन्यात सुरु होईल. त्यानंतर तीन वर्षात अटल सेतूवरुन केवळ दीड तासांत तुम्ही पुण्याला यालं. त्यामुळं पुणे-मुंबई जुना हायवेवर ताण येत होता त्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बांधला आणि आता परत नवा हायवे बांधणार आहोत, असं यावेळी गडकरींनी सांगितलं. Nitin Gadkari about Mumbai-Pune New Highway

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.