पुणे - जैन तत्त्वज्ञान आणि भारतीय वारसा यांना समर्पित असलेल्या ‘अभय प्रभावना’ या संग्रहालयाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ५) उद्घाटन करण्यात आले. ५० एकर जागेत ३.५ लाख चौरस फूट बांधकाम असलेले हे संग्रहालय मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर पारवडी येथे उभारण्यात आले आहे.