Nitin Gadkari on Chandni Chowk: पुणेकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. चांदणी चौक पुणेकरांच्या सेवेत सज्ज झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पूलाचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. दरम्यान नितीन गडकरी यांनी ते महाराष्ट्र बांधकाम मंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला.
नितीन गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पावर हजार कोटी खर्च झाले आहेत. पण या मार्गावर १ लाख ५५ हजार Passenger car units ट्रॅफीक आहे. पण मी नेहमी म्हणतो माणसाने चूक केली की ते स्वीकारली पाहिजे. माझ्या हातातून चूक झाली होती कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात.
मी जेव्हा महाराष्ट्रात बांधकाम मंत्री होतो. तेव्हा मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग बांधल्यानंतर पुण्यातील सात महानगरपालिकेचे रस्ते मी बांधले होते. त्यावेळी हा वेस्टर्नली बायपास ( जुना चांदणी चौक) मी बांधला होता. हा बांधत असताना याचे डिझाईन पुढेचे २० ते २५ वर्ष बघून करायला पाहिजे होत. ते न केल्यामुळे सर्व्हीस रोड देखील बरोबर नव्हते. उड्डाणपूल देखील नव्हते, असे नितीन गडकरी म्हणाले.
त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर अनेक समस्या तयार झाल्या. लोकसंख्या वाढत आहे. पुण्यात वाहणांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे ट्रॅफीकची समस्या देखील निर्माण झाली आहे. जस हार्टमध्ये चोकप झालं की आपण बायपास करतो. मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करिता नवीन टनल बांधा मग प्रश्न सुटेल. मात्र तरी देखील समस्या सुटली नाही, असे गडकरी म्हणाले. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.