देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही; अमित शहा

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (व्हॅमनिकॉम) रविवारी (ता.१९) आयोजित वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्रीय सहकारमंत्री शहा बोलत होते.
Amit Shah
Amit ShahSakal
Updated on
Summary

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (व्हॅमनिकॉम) रविवारी (ता.१९) आयोजित वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्रीय सहकारमंत्री शहा बोलत होते.

पुणे - देशाचे पाच ट्रिलियन डॉलर्सचे आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्यात सहकार क्षेत्राची (Cooperative Sector) मोठी भूमिका राहील. सहकार क्षेत्राच्या माध्यमातूनच देश आत्मनिर्भर होणार असून, प्रत्येक व्यक्तीचा सर्वसमावेशक विकास होण्यासाठी सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या (व्हॅमनिकॉम) रविवारी (ता.१९) आयोजित वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्रीय सहकारमंत्री शहा बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव देवेंद्र कुमार सिंह, अतिरिक्त सचिव विजय कुमार, 'व्हॅमनिकॉम'च्या संचालिका हेमा यादव आदी या वेळी उपस्थित होते.

दीक्षांत समारंभात व्हॅमनिकॉम'च्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविकाधारक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Amit Shah
"डॉ. आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसनं सोडली नाही"

शहा म्हणाले, देशातील १३० कोटी नागरिक आत्मनिर्भर होण्यासाठी सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत देशाचे नवीन सहकार धोरण तयार करण्यात येणार आहे. देशातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांमधील त्रुटी दूर करण्यात येतील. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण करून त्या जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक आणि नाबार्डशी जोडून त्यांच्या माध्यमातून कृषी वित्त पुरवठा सक्षम करण्यात येईल. त्याचा देशातील गरीब आणि लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत विविध 23 विभागाच्या योजना सक्षम करण्यात येणार आहेत. आगामी काळात सहकार क्षेत्राचे भवितव्य उज्वल राहणार असून, विद्यार्थ्यांनी सहकार क्षेत्रात पुढे येऊन सहकार चळवळ मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार असून, कृषी उत्पादनास योग्य भाव मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आगामी काळात सहकार क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन सहकार धोरणामध्ये सहकार क्षेत्र अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्तरावर सहकार विद्यापीठ स्थापन करणार :

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान सध्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. ही संस्था विविध राज्यांमधील सहकार क्षेत्राची जोडली गेली आहे. देशातील अशा सर्व सहकारी संस्थांना एकत्रित आणण्यासाठी देशात राष्ट्रीय स्तरावरील सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा शहा यांनी केली.

Amit Shah
जमिनीचा बेकायदा ताबा घेण्याचा धानोरेत प्रयत्न

अमित शहा यांनी दिला यशस्वी होण्याचा मंत्र

- आपण इतरांबाबत चांगला विचार केला तर लोकही आपल्याबाबत चांगलाच विचार करतील.

- नोकरीसोबत आत्मसंतुष्ट असणे महत्त्वाचे

पुणे शहर ऐतिहासिक आणि शिक्षणाचे केंद्र :

संपूर्ण देशात पुणे शहर हे ऐतिहासिक आणि शिक्षणाचे केंद्र मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वदेश, स्वराज्य आणि स्वधर्माचा नारा बुलंद केला. तोच नारा पुढे स्वातंत्र्यात परावर्तित झाला. अशा शहरात आणि त्यात सहकार क्षेत्रातील महापुरुष वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने असलेल्या सहकारी राष्ट्रीय प्रबंधन संस्थेतून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तोच भाव ठेवून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन शहा यांनी विद्यार्थ्यांना केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()