Pune Crime News : चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी केव्हा मिळणार?

येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण,महाळुंगे पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी गेले पंधरा दिवसापासून उपलब्ध नाहीत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाकण, महाळुंगे येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गुन्हे शाखेत केल्या आहेत .
Pune Crime News
Pune Crime News sakal
Updated on

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील चाकण,महाळुंगे पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी गेले पंधरा दिवसापासून उपलब्ध नाहीत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाने चाकण, महाळुंगे येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गुन्हे शाखेत केल्या आहेत . पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात विशेषत: पुणे जिल्ह्यात अतिसंवेदनशील असणाऱ्या पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी नसल्यामुळे पोलीस ठाण्यात नेमके काय चालले हे कळत नाही असे वास्तव आहे. प्रभारी अधिकारी दिलेले असले तरी त्यांनाही मर्यादा आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याला केव्हा मिळणार असा सवाल नागरिकांचा, उद्योजकांचा आहे.

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुणे जिल्ह्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमुळे चाकण, महाळुंगे पोलीस ठाण्याला विशेष महत्त्व आहे. चाकण औद्योगिक वसाहत व परिसरातील गुन्हेगारीचा आलेख मोठा आहे. घातक शस्त्र, पिस्तूल,गावठी कट्टे,तलवारी, गांजा बाळगणाऱ्या पासून खून, दरोडे, लूटमारीचे तसेच खंडणी, हप्ते मागणी व इतर प्रकार सातत्याने घडत असतात.महिलांच्या छेडाछेडीचे प्रकार सातत्याने घडत असतात.

ही दोन्ही पोलीस ठाणी महत्वाची आहेत. या पोलीस ठाण्यात गेल्या पंधरा दिवसापासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी नसल्यामुळे पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचे नियोजन, नियंत्रण व्यवस्थित होत नाही असा सवाल नागरिकांचा,कामगारांचा, उद्योजकांचा आहे.प्रभारी पोलीस अधिकारी दिलेले असले तरी त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुजू होणे महत्त्वाचे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नसल्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील चाकण, महाळुंगे परिसरात अवैध धंदे,मटका, जुगार यांना ऊत आला आहे.अवैध धंद्यावर नियंत्रण येण्यासाठी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे अशी नागरिक, कामगारांकडून मागणी होत आहे. अगदी राजेरोस पणे चाकण बस स्थानक आवारात तसेच चाकण, महाळुंगे परिसरात मटक्याला उत आला आहे .

Pune Crime News
Pune Drug News : मेफेड्रोन प्रकरणी आणखी एक जण ताब्यात

चाकण पोलीस ठाण्यामध्ये योग्य व शिस्तीने कामगिरी करत असलेले अशोक कदम हे नव्याने पाच महिन्यापूर्वी येथे रुजू झाले होते.त्यांची बदली लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गुन्हे शाखेमध्ये केलेली आहे. महाळुंगे पोलीस ठाण्यातही योग्य कारभार करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांची बदली अवघ्या दहा महिन्यात गुन्हे शाखेत झालेली आहे. त्यामुळे दोन अधिकारी या औद्योगिक वसाहतीच्या दोन पोलीस ठाण्यातून बदलून गेल्यामुळे पोलीस ठाण्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही हे वास्तव आहे.पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तांनी लवकरात लवकर या दोन्ही पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक द्यावेत अशी मागणी नागरिकांची, कामगारांची, उद्योजकांची आहे.

आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, " चाकण औद्योगिक वसाहत व परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी दबंग व कार्यक्षम अधिकारी पाहिजे. अधिक कर्मचारी वर्ग पाहिजे परंतु तो उपलब्ध नाही. आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून चाकण, महाळुंगे दोन्ही पोलीस ठाण्याला कार्यक्षम अधिकारी लवकर दिले पाहिजे.

याबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर काही अधिकारी मॅट मध्ये गेलेले आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक लवकर देण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.