Ajit Pawar : माझे कौतुक केले तर तुम्हाला का वाईट वाटतय - अजित पवार

राज्याच्या विकास करण्यासाठी, अनेक समस्या सोडवण्यासाठी, लोकप्रतिनिधींची कामे व्हावीत यासाठी मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला
no other strong leader like pm modi amit shah praises ajit pawar opposition politics
no other strong leader like pm modi amit shah praises ajit pawar opposition politicssakal
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे सक्षम नेतृत्व देशाला मिळाले आहे. त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, अशा शब्दात मोदी यांची स्तुती करतानाच ‘अमित शाहांनी माझे कौतुक केल्यानंतर तुम्हाला का वाईट वाटतंय?” असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना केला.

साखर संकुल येथे झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रविवारी (ता. ६) पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांचे कौतुक केले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

“आम्ही वडिलधाऱ्यांचा आदर करणारी माणसे आहोत. राज्याच्या विकास करण्यासाठी, अनेक समस्या सोडवण्यासाठी, लोकप्रतिनिधींची कामे व्हावीत यासाठी मी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काहीजण माझ्यावर टीका करतात की मी आधी असं बोलत होतो, आता तसं बोलतोय. पण अनुभवातून माणसाची मतं उमटत असतात. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० रेल्वे स्टेशन २५ हजार कोटींची तरतूद केली. पहिल्या टप्प्यात १२६ स्टेशनसाठी १३ हजार कोटींची तरतूद केली. यापैकी ४४ स्थानक महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येकाला ४० कोटी दिले आहेत. ४० कोटी रक्कम कमी नाही”, असे पवार यांनी सांगितले.

जयंत पाटील शहांना भेटले नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शहा यांना भेटल्याची चर्चा सुरू आहे, याबद्दल पवार म्हणाले, शहा यांना जयंत पाटील भेटले असे सांगणे हे धादांत खोटे आहे. ते जर भेटले असते तर भेटले असे सांगितले असते.

पाटील हे दोन दिवस पवार साहेबांसोबतच होते. त्यामुळे ते शहा यांना भेटले यात काहीही तथ्य नाही. मी देखील अमित शहा यांना भेटलो नव्हतो. आधी पाठिंबा दिला मगच त्यांची भेट घेतली होती, त्यापूर्वी कधीही भेटलो नाही, असे पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.