पुणे : गणेशोत्सवात सलग दोन वर्षे ध्वनी प्रदुषणात मोठी घट

पुणे : गणेशोत्सवात सलग दोन वर्षे ध्वनी प्रदुषणात मोठी घट
Updated on

पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साऊंड मॅपिंग एक्सरसाईजद्वारे केलेल्या संशोधनानुसार, सलग दोन वर्ष गणेशोत्सवाच्या काळात लक्ष्मी रस्त्यावर होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामध्ये घट झाली आहे. गेली 20 वर्ष गणपती विसर्जनाच्या दिवशी हे मुल्यमापन केले जात असून, या वर्षी सर्वाधिक कमी 59.8 DB(डेसीबल्स) नोंदविला आहे.

सीओईपीच्या संशोधकांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मिरणवूकांसह पार पडणारी विर्सजनप्रकिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावर पोलिस आणि महापालिका प्रशासनातर्फे सर्वत्र कडक बंदोबस्त करण्यात आला होता.'' मागील वर्षांच्या तुलनेत, आवाजाची पातळी परवानगीनुसार मर्यादेत असल्याने परिपूर्ण शांतता होती, अशी माहिती सीओईपीच्या अप्लाइड सायन्स विभागातील जीवशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक महेश शिंदीकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

पुणे : गणेशोत्सवात सलग दोन वर्षे ध्वनी प्रदुषणात मोठी घट
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन केंद्र

शिंदीकर आणि त्यांचे टीमने 19-20 सप्टेंबरला साऊंड मॅपिंग एक्सरसाईज केली होती. गणेश विसर्जन मिरणवणूक नसताना विसर्जनमार्गावरील ध्वनी पातळी मोजण्यात आली होतीएकूण सामान्य नोद झाली असून सर्व ठिकाणी आवाजाची पातळी परवानगीनुसार मर्यादेत होती.

वर्षानुवर्ष ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असून शांतता क्षेत्रात(50db डेसिबल्स) आणि रहिवासी क्षेत्रात (55b डेसिबल्स) मर्यादा निश्चित केली आहे. या वर्षी पहिल्यांदाच आवाजाची पातळी सरासरी 60 डेसिबलच्या जवळ गेली आहे. गेल्या वर्षी ही पातळी सरासरी 65.5 db(डेसिबल्स) होती तर 2019 मध्ये ती 86.2 db(डेसिबल्स) होती.

गेल्या 20 वर्षांमध्ये सरासरी आवाजाची पातळी 90 ते 95 dB पर्यंत पोहचली होती असून गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान वाजविण्यात येणारे ढोल-ताश, बँड बाजा आणि इतर वाद्यांमुळे ही पातळी 100 db (डेसिबल्स)च्या पुढे गेली होती.

पुणे : गणेशोत्सवात सलग दोन वर्षे ध्वनी प्रदुषणात मोठी घट
पुण्यात गृह खरेदीत आठ टक्क्यांनी वाढ

लक्ष्मी रस्त्यासह बेलबाग चौक, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, कुंठे चौक, उंबऱ्या गणपती चौक, भाऊसाहेब चौक, शेडगे विठोबा चौक, होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक आणि खंडुजीबाबा चौक या 10 ठिकाणी ही एक्सरसाईज पार पडली

यंदा 19 आणि 20 सप्टेंबर या दोन दिवशी आवाजाची पातळी दिवसा 67.1 db(डेसिबल्स) तर रात्री 45.02 db(डेसिबल्स) नोंदविण्यात आली अशी माहिती शिंदीकर यांनी दिली.19 सप्टेंबरला दुपारी या एक्सरसाईजची सुरवात झाली आणि 20 सप्टेंबरला रात्री 8 पर्यंत बंद करण्यात आली.

या संशोधकांच्या टीममध्ये मुरली कुंभारकर, नागेश पवार, पी कुलकर्णी, शुभम पाटील, विनित पवार, बालाजी नावंदे आणि शुभम अल्टे यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.