काम मिळत नव्हते, जवळ पैसे नाही, म्हणून कुटुंबाने मारली विहिरीत उडी; पण...

Well
Well
Updated on

पिंपळवंडी - लॉकडाउनमुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून बिबवेवाडीत एका कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पिंपळवंडीतही (ता. जुन्नर) शेतमजुराने पत्नी व दोन लहान मुलींसह विहिरीत उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे या चौघांना जीवदान मिळाले. विशेष म्हणजे, आळेफाटा येथील रुग्णालयानेही त्यांच्यावर मोफत उपचार सुरू केले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संगमनेर (ता. नगर) येथील शेतमजूर कुटुंबासह चार दिवसांपूर्वी आळेफाटा येथे काम शोधण्यासाठी आला होता. कोरोनामुळे त्यांना काम मिळत नव्हते. जवळ पैसे नसल्याने कुटुंबाची उपासमार होऊ लागली. यातून नैराश्‍य येऊन शेतमजुराने तीन व सहा वर्षांच्या दोन मुली आणि पत्नीसह विहिरीत उडी मारली. विहिरीत पडलेल्या चौघांचे आवाज ऐकून तेथील ग्रामस्थांनी आरडाओरडा केला.

तेथून जवळच शेतात बोरी (ता. जुन्नर) येथील दीपक शंकर सूर्यवंशी काम करीत होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी मारली व चौघांना पाण्याबाहेर काढले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तत्काळ आळेफाटा (ता. जुन्नर) येथील रुग्णालयात नेले. तेथील डॉ. आकाश आवारी, डॉ. राहुल पावडे व डॉ. सतीश कजबे हे त्यांच्यावर मोफत उपचार करीत असून, चौघांची प्रकृती स्थिर आहे. आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी या कुटुंबाची भेट घेतली असून, त्यांना धीर दिला.

‘कोरोना’तही माणुसकी 
सध्या कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण आहे. अनोळखी व्यक्तीला मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दीपक सूर्यवंशी या तरुणाने अशी भीती मनात न बाळगता विहिरीत उडी मारून चौघांचे प्राण वाचविले. त्याच्या या धाडसाबद्दल परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

उपासमारीमुळे टोकाचे पाऊल
लॉकडाउनमुळे या शेतमजुराला काम मिळत नव्हते. संगमनेरवरून आल्यानंतर जवळचे पैसे संपून गेले. त्यातून कुटुंबाला खायला काय द्यायचे, असा प्रश्‍न शेतमजूर दांपत्यापुढे निर्माण झाला. अनेकदा त्यांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. यातून आलेल्या नैराश्‍यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.