Pune News : रिल्ससाठी जीव धोक्‍यात घालणाऱ्या तरुण-तरुणीला पोलिसांकडून नोटीस

पोलिस ठाण्यात बोलावून दिली समज, न्यायालयात हजर केले जाणार
Crime news
Crime newsesakal
Updated on

पुणे ः मुंबई - बंगळुरु महामार्गावर कात्रज परिसरात स्वामी नारायण मंदिर जवळ दरी पुलाजवळील पडक्‍या उंच इमारतीवरून जीव धोक्‍यात घालून रिल्ससाठी स्टंटबाजी करण्याचा प्रकार तरुण-तरुणीच्या आता चांगलाच अंगलट आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Crime news
Nashik News : जलतरण खेळाडू सरावापासून वंचित; राजमाता जिजाऊ तरण तलावांमधील डायव्हिंग पूल बंदच!

मिहीर गांधी व मीनाक्षी साळुंखे असे तरुण तरुणीचे नाव आहे. दोघांनीही दरी पुलाजवळील उंच इमारतीवरून जीव धोक्‍यात घालत रिल्स बनविला होता. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुकवर प्रसारित झाला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या घटनेची गांभीर्याने दखल घेत भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध स्वतःचे

Crime news
Nashik News : जलतरण खेळाडू सरावापासून वंचित; राजमाता जिजाऊ तरण तलावांमधील डायव्हिंग पूल बंदच!

स्वत:चे व इतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्‍यात आणणारी कृती केल्याप्रकरणी (भारतीय दंड संहिता कलम ३०८, ३३६) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संबंधित तरुण-तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी दोघांनाही बोलावून त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. दोन दिवस पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समजही देण्यात आली आहे. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. त्यांच्यासमवेत व्हिडिओ शूटिंग करणारे कोण कोण साथीदार आहे त्यांचा तपास करण्यात येत आहे.

रिल्ससाठी जीवघेणी स्टंटबाजी !

संबंधित तरूणीच्या इन्स्टाग्राम आयडीवर अशा प्रकारचे स्टंट करून धोकादायक व्हिडिओ बनविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी केवळ पुण्यातच नाही, तर लोणावळा, मुंबई व अन्य ठिकाणी देखील याच स्वरूपाचे जीव धोक्‍यात घालून रिल्स बनविले असल्याची माहिती समाज माध्यमांवर संबंधित रिल्स प्रसारित झाल्यानंतर त्यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे रिल्स केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.