IT Employee : बोनस हवा? ऑफिसला या! ; आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांची कर्मचाऱ्यांना सूचना

दिवाळीत, पगारवाढीच्या वेळी आणि दर तीन ते सहा महिन्यांनी देण्यात येणारा कामगिरी बोनस (परफॉर्मन्स बोनस) आणि प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) हवा असेल तर ऑफिसमध्ये येऊन काम करा. ‘वर्क फ्रॉम होम’ आता चालणार नसून, ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ केले नाही तर बोनस विसरा, असा आदेश माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांनी काढला आहे.
Notice to employees of big companies in the IT sector
Notice to employees of big companies in the IT sector Sakal
Updated on

पुणे : दिवाळीत, पगारवाढीच्या वेळी आणि दर तीन ते सहा महिन्यांनी देण्यात येणारा कामगिरी बोनस (परफॉर्मन्स बोनस) आणि प्रोत्साहन भत्ता (इन्सेंटिव्ह) हवा असेल तर ऑफिसमध्ये येऊन काम करा. ‘वर्क फ्रॉम होम’ आता चालणार नसून, ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ केले नाही तर बोनस विसरा, असा आदेश माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील काही बड्या कंपन्यांनी काढला आहे. सर्वच कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधून काम करावे, यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) सवलत दिली होती. त्यासाठी अनेकांना कामासाठी आवश्यक असलेले सेटअप देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची सूचना केली होती. मात्र अनेकांनी त्यास विरोध करून घरूनच काम करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. घरून काम करणे सोयीचे ठरत असल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांचे म्हणणे लक्षात घेत काही कंपन्यांनी हायब्रीड पद्धतीने कामकाज सुरू केले होते. मात्र त्यानंतरही अनेक कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत असल्याने त्यांना पुन्हा कार्यालयात येऊन काम करण्यासाठी आयटी कंपन्यांनी बोनसचा आधार घेतल्याचे दिसते. एकूण हजेरी दिवसांत किती दिवस ऑफिसमध्ये येऊन काम केले तसेच किती दिवस ‘वर्क फ्रॉम ऑफीस’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’ केले होते यांचा विचार करून बोनसची रक्कम ठरवली जाणार आहे.

काही कौटुंबिक कारणांमुळे मी गेल्या दोन वर्षांपासून ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहे. कंपनीने मला गेल्या तीन महिन्यांपूर्वी कार्यालयातून काम करण्याची सूचना केली होती. मात्र माझ्या विनंतीनंतर मला पुन्हा सहा महिने घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण आता कंपनीने जाहीर केले आहे की, हजेरीच्या टक्केवारीनुसार बोनस देण्यात येणार आहे. मी अनेक दिवस घरूनच काम केले आहे. त्यामुळे सहाजिकच मला कमी बोनस मिळणार असल्याचे दिसते.

- रौनक, आयटी कर्मचारी

कोणी ‘वर्क फ्रॉम होम’ मागू नये म्हणून आमच्या कंपनीत प्रशासन नवनवीन युक्त्या लढवत आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला खरच गरज असेल तर त्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यायला हवी. आमच्या कंपनीत देखील बोनस हवा असेल तर ऑफिसला जाऊन काम करणे बंधनकारक केले आहे.

- आयटी कंपनीत काम करणारी तरुणी

असे होणार बोनसचे वाटप

हजेरीची टक्केवारी बोनस

८५ हून अधिक १०० %

७५ ते ८० ७५ %

६० ते ते ७५ ५० %

६० पेक्षा कमी ० %

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.