प्राणी संग्रहालयातील वाहनतळ ठेकेदाराला नोटीस

चार दिवसांत याबाबत खुलासा करण्याचे आदेश
Notice to Zoological Museum Parking Contractor
Notice to Zoological Museum Parking Contractor
Updated on

कात्रज - राजीव गांधी प्राणीसंग्रहलाय वाहनतळ येथे महापालिकेने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अव्वाच्या सव्वा पैसे पर्यटकांकडून वसूल करणाऱ्या ठेकेदारास महापालिकेने नोटीस बजावली आहे. येत्या चार दिवसांत याबाबत खुलासा करण्याचे आदेश या नोटीसीमार्फत देण्यात आले आहेत. यापूर्वीही या ठेकेदारास दोन वेळा नोटीस बजावली आहे. तसेच, दंडही करण्यात आलेला आहे. यापुढे तक्रार आल्यास या वाहनतळाचा ठेकाच रद्द करण्याची कारवाई महापालिकेकडून केली जाणार आहे. याबाबत वाहनतळावर पर्यटकांकडून तिप्पट वसुली होत लूट असल्याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित केले होते.

पुढील चार दिवसांत याबाबत सविस्तर खुलासा करण्याचे आदेश प्रकल्प कार्यकारी अभियंता अभिजित आंबेकर यांनी दिले आहेत. चार दिवसांत हा खुलासा न करण्यात आल्यास ठेकेदाराचे काहीही म्हणणे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. महापालिकेकडून कात्रज प्राणीसंग्रहलायाच्या वाहनतळाचा ठेका हा कृष्णा कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास ३१ डिसेंबर २०२१ पासून देण्यात आलेला आहे. नियमांनुसार दुचाकीसाठी प्रतितास २ रुपये तर चारचाकीसाठी प्रतितास १० रुपये शुल्क आकारणे अपेक्षित असताना या ठेकेदारांकडून तिप्पट वसुली करण्यात येत होती. त्याचबरोबर, वाहनतळाच्या आवारात कुठेही दरफलक किंवा तक्रार क्रमांक लावण्यात आलेला नव्हता. ते सकाळमध्ये तिप्पट वसुलीचे वृत्त प्रकाशित झाल्यानतंर लावण्यात आले आहे.

कोरोनानंतर मार्चमध्ये प्राणी संग्रहालय चालू झाल्यापासून साडेसात लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. या माध्यमांतून महापालिकेला अडीच कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. वाघ, सिंह, हत्ती यांच्यासह वेगवेगळ्या प्रजातीचे साप आणि अन्य वन्यजीव येथे पाहायला मिळतात. यासाठी राज्यासह देश-परदेशातून पर्यटक येतात. या पर्यटकांसाठी महापालिकेने राजीव गांधी वाहनतळाची सोय केलेली आहे. या वाहतळावरूनच पर्यटकांची हजारो रुपयांची लूट झाल्याचे समोर आले होते. चारचाकीसाठी ३० रुपये तर, दुचाकीसाठी थेट पाच तासाचे दहा रुपये आकारले जात होते. अशावेळी चारचाकी वाहनांसाठी वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती देण्यात येत नाही. एखाद्या पर्यटकांने ती आवर्जून मागीतलीच तर तिच्यावर शुल्काची रक्कम न टाकता तारीख आणि वेळ नमूद असलेली पावती दिली जात असे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.