Electricity News: आता शेतीला मिळणार दिवसा वीजपुरवठा..

The process of acquiring necessary government land under this Scheme has been completed: या योजना अंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रात एकूण 170 उपकेंद्रांसाठी 900 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे.
cm eknath shinde
cm eknath shinde sakal
Updated on

Pune: शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्रात एकूण 170 उपकेंद्रांसाठी 900 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 41 उपकेंद्रांसाठी 234 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या योजनेतंर्गत आवश्यक शासकीय जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले असून 170 उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येईल व उपकेंद्रांतील वीजवाहिन्यांद्वारे शेतीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

5 हजार 344 एकर जमिनीचे अधिग्रहण

या योजनेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील 707 उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 5 हजार 877 मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य असून, आतापर्यंत 5 हजार 344 एकर शासकीय जमिनींचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये प्रत्यक्ष सौर ऊर्जा निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील 39 उपकेंद्रांसाठी 208 मेगावॅट, सांगलीतील 32 उपकेंद्रांसाठी 207 मेगावॅट, कोल्हापुरातील 44 उपकेंद्रांसाठी 170 मेगावॅट, पुण्यातील 41 उपकेंद्रांसाठी 234 मेगावॅट आणि सोलापूर जिल्ह्यातील 14 उपकेंद्रांसाठी 81 मेगावॅट, असे एकूण 170 उपकेंद्रांसाठी 900 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम संबंधित एजन्सीकडून सुरू झाले आहे.

ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार

या योजनेतून शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार असून, राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. विकेंद्रित पद्धतीने राज्यामध्ये अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ती 25 वर्ष चालवणे आणि देखभाल व दुरुस्ती करण्याद्वारे ग्रामीण भागात अंदाजे 6 हजार पूर्णवेळ; तर 13 हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होतील. ग्रामपंचायतींना अंदाजे 200 कोटींपेक्षा जास्त अनुदान प्राप्त होऊन जनसुविधेची कामे करणे शक्य होणार आहे.

cm eknath shinde
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा..

उपकेंद्राच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील, त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत 15 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांना संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांनी सहकार्य करावे.

- अंकुश नाळे, पुणे प्रादेशिक संचालक, महावितरण

योजनेचे फायदे

1) शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा 12 तास वीजपुरवठा उपलब्ध होणार.

2) प्रत्येक ग्रामपंचायतींना पाच लाख प्रतिवर्ष असे तीन वर्षांत 15 लाख रुपयांचे अनुदान.

3) राज्यामध्ये अंदाजे 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल.

4) अंदाजे 6 हजार पूर्णवेळ तर 13 हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होतील.

cm eknath shinde
Donald Trump: हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प झाले मालामाल; एका दिवसात शेअर्समधून कमावले इतके बिलियन डॉलर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com