मयुर कॉलनी - भाबुर्डा वन विभागाच्या परिसरात वेताळ टेकडीवर दररोज हजारो पुणेकर व्यायाम करण्यासाठी येत असतात. मात्र या परिसरात काही टवळखोरांचा उपद्रव वाढला असून व्यायाम प्रेमींना टेकडी असुरक्षित असल्याची भिती निर्माण झाली आहे. टेकडीवर मोठ्या आवाजात स्पिकरवर गाणी वाजवणे, मद्यपान करून प्लास्टिक बाटल्या झाडीत फेकणे, नागरिकांना दमदाटी करणे, टेकडीवर अंतर्गत नवीन पायवाटा निर्माण करणे, मोठ्या आवाजात ओरडणे, लहान पायवाटेच्या मार्गावरून दूचाकी चालवणे. या गोष्टींमुळे वन्यजीवांसह नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्यावतीने यावरती त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यायाम प्रेमी कडून केली जात आहे.
प्रशासनाच्यावतीने गस्त वाढवली आहे. काही लोकांवर कारवाई देखील करतो. शनिवार, रविवारी प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करतो. सिंहगडावरची घटना झाल्यापासून अनेक दुर्गम भागात ट्रेकिंगला परवानगी देत नाही. गरजेनुसार कलम १४४ देखील घोषित करत असतो.
- राहुल पाटील उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग.
टेकडीवर जाण्यासाठी अनेक ठिकाणांहून पाऊलवाटा तयार झाल्या आहेत. या माध्यमातून अनेक टवाळखोर आतमध्ये जातात. झाडीमध्ये मद्यपान करून आतमध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास देतात. पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या जागोजागी फेकून देतात. वर्षातून दोन वेळा आम्ही पंचेवीस ते तीस पोती वाटल्या गोळा करतो.प्लास्टिक बाटल्यांचा वन्य प्राण्यांवर परिणाम होतो. दमदाटी करणे असे प्रकार घडतात. वन विभागाच्यावतीने सुरक्षा वाढवावी व गस्त वाढवावी.
- जय आपटे, पक्षीप्रेमी एरंडवणे.
ध्वनिप्रदूषणा बाबत भारतीय समाज अत्यंत अडणीपणाच्या व असंवेदनशील पातळीवर आहे. निसर्गावर आपलाच नाही तर पशु, पक्षी यांचा सुद्धा हक्क आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. शांत निसर्गाचा आनंद तितक्याच शांतपणे घेता आला पाहिजे.भाबुर्डा वन विभागाने तेथे गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. सामाजिक उपद्रव व अशांतता पसरवणे, ध्वनिप्रदूषण करणे, आजूबाजूच्या रहिवाश्यांचा शांतपणे झोपण्याचा हक्क भंग करणे याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला पाहिजे.
- अॕड.असीम सरोदे
भाबुर्डा वनचे एकूण क्षेत्रफळ-६३२७१.१४ हेक्टर
एकूण कर्मचारी/ सेवक
१५ वनरक्षक
४ वनपाल
१ वन अधिकारी
१० वन मजूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.