पुणे : पुणे विभागात पाच जिल्ह्यांतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा पाच हजारांवर पोचला आहे. त्यात केवळ एकट्या पुणे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा आकडा जवळपास सव्वाचार हजारांहून अधिक आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हा आकडा वाढतच आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 996 झाली आहे. त्यापैकी 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 2 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात कोरोनाबाधीत 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 172 रुग्ण गंभीर आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्ह्यात 215 रुग्णांचा मृत्यू :
पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मंगळवारी सायंकाळपर्यंत 4 हजार 280 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 हजार 69 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 1 हजार 996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधित 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.