पुणे - महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यात आघाडी कायम ठेवली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सरासरी २८ लाख ७० हजार ९८९ ग्राहक दरमहा वीजबिल भरतात.
त्यातील ७४.५ टक्के म्हणजे २१ लाख ३८ हजार ३४८ ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ‘ऑनलाइन’साठी ३ लाख ५ हजारांनी ग्राहकसंख्येत भर पडली असून, भरण्याची रक्कमदेखील १२९ कोटी रुपयांनी वाढली आहे.
पुणे शहरात गेल्या वर्षभरात ‘ऑनलाइन’साठी पसंती दिलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ४६ हजार ३०० ने वाढली असून, रकमेतही ५९ कोटी ३१ लाख रुपयांनी भर पडली आहे. सद्यःस्थितीत सरासरी ११ लाख ८० हजार १९१ (७३.६ टक्के) ग्राहक दरमहा २९५ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात ७ लाख ४ हजार ७६३ लघुदाब वीजग्राहक दरमहा वीजबिलाचा भरणा करीत आहेत. त्यातील ५ लाख ६३ हजार ८५ (८० टक्के) ग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे १५१ कोटी ७६ लाख रुपयांचा भरणा करीत आहेत. २०२३ मध्ये या ग्राहकसंख्येत ८१ हजार १८० ने भर पडली असून, ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याची रक्कम ३५ कोटी ७४ हजार रुपयांनी वाढली आहे.
ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये लघुदाबाच्या सरासरी ५ लाख ६३ हजार ३४४ पैकी ३ लाख ९५ हजार ७४ (७०.१ टक्के) वीजग्राहक ‘ऑनलाइन’द्वारे १११ कोटी ३५ लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा करीत आहेत. २०२३ मध्ये या ग्राहकसंख्येत ७७ हजार ८११ ने भर पडली असून, भरण्याची रक्कम ३३ कोटी १५ लाख रुपयांनी वाढली आहे.
महावितरणच्या ‘ऑनलाइन’ सेवेला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘ऑनलाइन’सोबतच लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची किमान रक्कम पाच हजार रुपये केली आहे. त्यानुसार पाच हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे.
-राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.