पुणे : आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर राज्य सरकारने नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी पुणे महापालिकेला २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्य सरकारच्या आदेशात ८८ कामांचा उल्लेख व निधीची तरतूद दाखविण्यात आली आहे. .पण महापालिका प्रशासनाने ८८ कामांच्या पाच निविदा काढताना या प्रत्येक ठिकाणचे इस्टिमेट न जोडल्याने त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने हरकत घेतली आहे. त्यातच या कोट्यावधी रुपयांच्या या निविदेसाठी मर्जीतील ठेकेदारांना मिळाव्यात यासाठी शहरातील वजनदार राजकारण्यांचा खटाटोप सुरु झाला आहे.पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ ला ढगफुटी होऊन आंबिल ओढ्याला पूर आला. वस्त्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक सोसायट्यांच्या सीमा भिंत पडल्या, २० पेक्षा अधिक जणांचा यामध्ये बळी गेला होता. त्यानंतर महापालिकेने आंबिल ओढ्याच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंती, नवीन पूल बांधले पण काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे काम करता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मार्च महिन्यात मंजूर केला..राज्य सरकारने यानंतर ३० जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढत या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली, त्यासाठी शहरात कोण कोणत्या भागात सीमा भिंत बांधली जाणार आहे याचा स्पष्ट उल्लेख करून, त्यासमोर खर्चाची तरतूद केली आहे. त्यामुळे निविदा काढताना प्रत्येक ठिकाणच्या कामाचे इस्टिमेट जोडणे आवश्यक होते, पण महापालिका प्रशासनाने ८८ कामांची पाच विधानसभा मतदारसंघात विभागणी करताना इस्टिमेट जोडले नाही. पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या पाच विधानसभा मतदारसंघनिहाय निविदा काढण्यात आल्या आहेत. .त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर हरकत घेत, शासनाच्या आदेशात ज्या पद्धतीने कामे सुचविण्यात आली आहेत तशा निविदा काढाव्यात असे महापालिकेला सांगण्यात आले. त्यानंतर या निविदा रद्द करण्याची प्रक्रिया सुर होती. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीतून सूत्र फिरल्यानंतर या निविदा कायम ठेवण्यात आल्या आहेत. पाचही विधानसभा मतदारसंघात काम करण्यासाठी ठेकेदारांच्या निविदा दाखल झाल्या आहेत, पण या कामाची निविदा भरून स्पर्धा वाढवू नये यासाठीही माननियांचे कामकाज पाहणाऱ्या कार्यकर्त्यांकडून ठेकेदारांना फोन गेले आहेत, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली..या भागात बांधल्या जाणार सीमाभिंतवानवडी सोसायटी, भैरोबा नाला, सोपानबाग, बी.टी. कवडे रस्ता, कोरेगाव पार्क, वानवडी गावठाण, निलम पार्क ते बागूल उद्यान, सिंहगड रस्ता, पद्मावती, कटारिया हायस्कूल, के. के. मार्केट ते गुरुराज सोसायटी, मंत्रीपार्क, तेजस सोसायटी, शास्त्रीनगर, डहाणूकर कॉलनी व परिसरातील भाग, बालाजीनगर, बिबवेवाडीतील आंबिल ओढा, मानाजी नगर नऱ्हे, वारजे, भुसारी कॉलनी, बावधन, कुंबरे पार्क एकलव्य कॉलेज, पॉप्युलर नगर, सिप्ला रुग्णालय वारजे, सावित्री गार्डन ते चव्हाण बाग, काळूबाई मंदिर, आंबे माता मंदिर धायरी, इंदिरा शंकर सोसायटी, आदित्य गार्डन, औंध आयटीआय, सिंध सोसायटी, मंत्री रिव्हेरा सोसायटी बोपोडी,निलज्योती म्हाडा कॉलनी यासह ८८ ठिकाणांचा समावेश आहे..Pune News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करत सरकारचा निषेध.‘‘राज्य शासनाकडून नाल्याला सीमा भिंत बांधण्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी आला आहे. त्यासाठी पाच विधानसभा मतदारसंघनिहाय निविदा काढण्यात आली आहे. या आदेशात ८८ ठिकाण आणि त्यांची तरतूद दिलेली आहे. त्यामुळे त्याचे इस्टिमेट जोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्यानुसार सुधारणा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी फाइल पाठवली जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतरच अ पाकिट उघडले जातील.’’- संतोष तांदळे, अधिक्षक अभियंता, मलनिःसारण विभागविधानसभानिहाय निविदा रक्कम आणि ठेकेदारांचे आलेले प्रस्तावखडकवासला - ४१.२३ कोटी - ९शिवाजीनगर - २४.८० कोटी - ७कॅन्टोन्मेंट - ३९.०४ कोटी - ७पर्वती - ४१.१५ कोटी - ४कोथरूड - १९.९० कोटी - ९.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.