पुण्यात गुणवाढीसाठी अधिकाऱ्याने घेतले 20 लाख रुपये 

पुण्यात गुणवाढीसाठी अधिकाऱ्याने घेतले 20 लाख रुपये 
Updated on

पुणे - ग्रेस मार्क धोरणाचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुनर्मूल्यमापन करताना ते वाढवून देण्यासाठी मूल्यमापन अधिकारी संदीप हेंगले याने तब्बल 20 लाख रुपये घेतल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याने आरोपी सुमीत अग्रवाल याला 11 हजार विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीत सप्टेंबर 2018 ते डिसेंबर 2019 दरम्यान घडला होता. अग्रवाल (वय 35, रा. अलवर, राजस्थान) याला सायबर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली आहे. यापूर्वी अटक केलेला हेंगले (वय 49, रा. गणेशमळा, धायरी) सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हेंगळे हा सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा मूल्यमापन विभागाचा प्रमुख अधिकारी होता. हेंगले हा दोन वेगळ्या नावाने मेल आयडी तयार करून अग्रवालशी संपर्क करीत असे. त्याने अग्रवालला दिलेल्या माहितीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थींचे संपर्क क्रमांक होते. अग्रवाल हा संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांच्याकडून पास करून देण्यासाठी पैसे घेत असे. जे विद्यार्थी पैसे देत, त्यांचे पैसे व यादी अग्रवाल हेंगलेला पाठवीत होता. तपासात अग्रवाल याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशांपैकी 20 लाखाहून अधिक रुपये हेंगले याला दिले असे सांगितले आहे. पुढील तपासासाठी न्यायालयाने अग्रवालची 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी रवानगी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अग्रवाल माजी विद्यार्थी 
अग्रवाल हा सिंबायोसिसचा माजी विद्यार्थी आहे. त्याने ओपन एज्युकेशनमधून एक डिप्लोमा केला होता. त्यावेळी त्याने सोईस्कर सेंटर मिळावे, यासाठी हेंगले याच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांनी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पास करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.