भारती विद्यापीठ ते शंकर महाराज उड्डाण पुलावर ऑईल गळती; वाहतूक बंद

दोन जण जखमी झाले असल्याशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
भारती विद्यापीठ ते शंकर महाराज उड्डाण पुलावर ऑईल गळती; वाहतूक बंद
Updated on
Summary

दोन जण जखमी झाले असल्याशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

धनकवडी : कात्रज (katraj) येथून स्वारगेटच्या दिशेने येत असलेल्या खाजगी बस(private bus) गाडी मधून ऑईल गळती झाल्याची घटना घडली. त्यामुळे पुणे- सातारा रस्त्यावर(Pune-satara road) वाहतूक कोंडी झाली. आज रविवार आणि त्यात गळती घटना घडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या उड्डाणपूलावर गळती झालेल्या ऑईल वर माती टाकण्याचं काम अग्निशमन दल(fire brigrade) करत आहे. पूल तात्पुरता वाहतुकी साठी बंद ठेवला आहे. स्थानिक रहिवासी विशाल कड म्हणाले सकाळी साडे नऊ दरम्यान याभागातून जात असताना गर्दी दिसली गाड्या घसरत असल्याचं दिसलं आणि पोलीस यंत्रणेला कळविले त्यानुसार वाहतूक विभागाचे पोलीस प्रशासनतात्काळ दाखल झाले. गेल्या 2 तासांपासू गळती सुरू आहे. ऑईल वर माती टाकण्याचे काम सुरू आहे.

भारती विद्यापीठ ते शंकर महाराज उड्डाण पुलावर ऑईल गळती; वाहतूक बंद
पुण्यामधील शहांच्या फ्लेक्स वरून वाद

साडे नऊच्या दरम्यान खाजगी बस मधून ऑईल लीकेज झाल्यामुळे भारती विद्यापीठ ते स्वारगेट चा शंकर महाराज उड्डाणपूलावर एका बाजूने ऑईल साडल्यामुळे अग्निशमन दलाच्या माध्यमातून माती टाकण्याचे काम सुरू आहे. दोन जण जखमी झाले असल्याशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली तसेच एक दुचाकीस्वार गळती झालेल्या ऑइलवरुन घसरत पुलावरून खाली पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.