आळेफाटा (पुणे) : साकोरी (ता. जुन्नर) येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचे प्रधानमंत्री (पीएम) किसान सन्मान योजनेचे एकूण ८ हजार रुपये चुकून उस्मानाबाद येथील मयूर मोटे यांच्या बँक खात्यावर जमा झाले होते. दरम्यान, मयूर मोटे यांनी साकोरी येथे आज (ता. १) दुपारी संबंधित वृद्ध शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन चुकून बँक खात्यावर जमा झालेले त्याचे पैसे संबंधित शेतकऱ्याकडे सुपूर्द केले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
साकोरी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुळे यांनी येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचे पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा होत नसल्याचे, बेल्हे येथील महा ई सेवा केंद्राचे सुनिल विश्वासराव यांना सांगितले. यावेळी विश्वासराव यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून चौकशी केली असता, हे पैसे उस्मानाबाद येथील मयूर मोटे यांच्या बँक खात्यावर जमा होत असल्याचे निदर्शनास आले. विश्वासराव यांनी उस्मानाबादचे मयूर मोटे यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी मोटे यांना आपल्या बँक खात्यावर दुसऱ्या शेतकऱ्याचे पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे चुकून जमा होत असल्याचे निदर्शनास आले.
मोटे यांनी साकोरी येथे संबंधित वृद्ध शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याचे चुकून बँक खात्यावर जमा झालेले सर्व पैसे संबंधित शेतकऱ्याकडे सुपूर्द केले. यावेळी संबंधित वृद्ध शेतकऱ्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. यावेळी साकोरी ग्रामस्थांच्या वतीने मोटे यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. दरम्यान, बेल्हे येथील एका शेतकऱ्याचे पीएम किसान सन्मान योजनेचे ६ हजार रुपये, येथील एक तमाशा कलावंत बुढन बेपारी यांच्या बँक खात्यावर जमा झालेले होते. गेल्या आठवडाभरापूर्वी त्या तमाशा कलावंताने संबंधित शेतकऱ्याचे पैसे त्यास प्रामाणिकपणे परत केले. त्यावेळी बेल्हे ग्रामस्थांच्या वतीने संबंधित तमाशा कलावंताचा सत्कार करण्यात आला होता. दरम्यान, यावेळी सुनिल विश्वासराव व गणेश चोरे यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.