Cycle Journey : भर उन्हात तरूणांना लाजवणारा ज्येष्ठांचा पुणे हैद्राबाद सायकल प्रवास

नियमित व्यायामाने उत्तम आरोग्य व त्याच्या जोडीला इच्छा शक्ती असेल तर मग कुठल्याही छंदाला वय आडवे येत नाही. असाच प्रत्यय पुणे-हैद्राबाद सायकल रॅलीत येत आहे.
Old Man Cycle Journey
Old Man Cycle Journeysakal
Updated on

केडगाव - नियमित व्यायामाने उत्तम आरोग्य व त्याच्या जोडीला इच्छा शक्ती असेल तर मग कुठल्याही छंदाला वय आडवे येत नाही. असाच प्रत्यय पुणे-हैद्राबाद सायकल रॅलीत येत आहे. त्याचे कारण असे की, या सायकल रॅलीत सहभागी असणा-यांचे वय ६५ ते ७७ दरम्यानचे आहे. पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची पुणे ते हैद्राबाद रॅली तरूणांना लाजवत आहे.

हैद्राबाद येथे त्वचा रोगाशी संबंधित जागतिक आरोग्य परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होणारे पुण्यातील त्त्वचा रोग तज्ञ डॅाक्टर नरेंद्र पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल रॅली जात आहे. कडक उन्हात ५८० किलोमीटरचे अंतर सहा दिवसात कापले जाणार आहे. रॅलीतील ज्येष्ठांचा उत्साह चकित करतो.

पुणे सायकल प्रतिष्ठाण व आयएडिव्हीएल यांच्या सहकार्याने ही सायकल रॅली आयोजित केली आहे. काल ससून रूग्णालयातून त्यांच्या रॅलीला माजी आमदार मेधा कुलकर्णी, आशिष कासोदेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. चौफुला येथे काल रॅलीचा मुक्काम होता. आज सकाळी ते इंदापुर मुक्कामासाठी रवाना झाले.

चौफुला येथे वर्षा उद्योग समुहाचे प्रमुख नारायण काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती नितीन दोरगे, कार्यकर्ते पृथ्वीराज जगताप, सतीश म्हेत्रे, शरद बिटके यांनी त्यांचे स्वागत केले.

रॅलीबरोबर त्वचेची काळजी कशी घ्यावी, काय उपाय करावेत, काय करू नये याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मोठ्या स्क्रीनवर त्वचेबाबत ध्वनी चित्रफित दाखवून पत्रके वाटली जात आहेत. याबाबत डॅा. नरेंद्र पटवर्धन म्हणाले, त्वचेचे आजार हे वेळखाऊ व महागडे आहेत. उपचार करणा-यांमध्ये भोंदूगिरी खूप वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम रूग्णाला भोगावे लागत आहे. त्यासाठी तज्ञ्ज डॅाक्टरांकडूनच उपचार घ्यावेत.

रवींद्र जोशी (वय-७७) म्हणाले, सायकलवरून प्रवास केल्याने स्थानिकांशी संवाद साधता येतो. परिसराची माहिती होते. आरोग्य उत्तम राहते. माझा सायकलवरचा नियमित व्यायाम आहे. त्यामुळे या वयातही रॅलीमध्ये मी सहज सायकल प्रवास करत आहे. प्रदीप भवाळकर (वय-६९) म्हणाले, माझी ही २५ वी रॅली असून सायकलवरून दोन लाख किलोमीटर प्रवास केला आहे. यातील सर्वात मोठी रॅली कच्छ ते अरूणाचल प्रदेश अशी होती.

चार हजार किलोमीटरचे हे अंतर आम्ही ३६ दिवसात कापले होते. जुगल राठी (वय-७५) म्हणाले, मी सायकलवरून नर्मदा परिक्रमा केली आहे. (३२०० किलोमीटर). अपर्णा महाजन (वय-७१) यांची ही आठवी रॅली आहे. राहू (ता. दौंड) येथील नंदू भटेवरा व सविता भटेवरा हे दांपत्य या रॅलित सहभागी आहे. 'सायकल चलावो सेहत बनाओ' हा संदेश भटेवरा दांपत्य देत आहे. आमदार राहुल कुल यांनी या रॅलीला चौफुला येथे शुभेच्छा दिल्या.

चौफुला ते इंदापूर हे ८५ किलोमीटरचे अंतर चार तासात पुर्ण केले. स्वप्नील गुप्ते, भूषण आपटे, प्रकाश कुलकर्णी, नितीन दामले, विश्वनाथ गोखले, अतुल गोपाल, अनिल जमतानी हे सुद्धा रॅलीत सहभागी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.