ज्येष्ठांनो, अशी घ्या काळजी....

Old-People
Old-People
Updated on

कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पुढील उपाययोजना करून ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली जाऊ शकते...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय करावे

  • घरातच राहा. पाहुण्यांना भेटू नका. भेटणे अत्यावश्यक असेल तर बोलताना एक मीटरचे अंतर ठेवा.
  • थोड्या थोड्या वेळाने आपले हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवा.
  • अगदी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा अजिबात बाहेर जाऊ नका.
  • केवळ घरात शिजलेला ताजा आणि पोषक आहार घ्या. पाणी प्या आणि फळांचा ताजा रस पिऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
  • व्यायाम आणि प्राणायाम करा.
  • तुम्हाला दररोज घ्यायला सांगितलेली सर्व औषधे नियमित घ्या.
  • तुमच्या कुटुंबीयांशी संवाद साधा, नातेवाईक, मित्र यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क करा, गरज पडल्यास कुटुंबीयांची मदत घ्या.
  • तुमच्या काही शस्त्रक्रिया ठरल्या असतील, उदा. डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन, गुडघे प्रत्यारोपण, तर अशा शस्त्रक्रिया पुढे ढकला.
  • वारंवार स्पर्श केली जाणारी सर्व ठिकाणे जंतुनाशक पाण्याने नियमित स्वच्छ करा.
  • जर आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा 

काय करू नये

  • शिंक किंवा खोकला आल्यास कधीही मोकळ्या हातावर किंवा चेहरा न झाकता शिंकू/खोकू नका.
  • आपल्याला ताप आणि खोकला असेल तर आपल्या आसपासच्या व्यक्तींच्या जवळ जाऊ नका.
  • तुमचे डोळे, चेहरा, नाक आणि जीभ यांना स्पर्श करू नका.
  • संसर्ग झालेल्या/आजारी व्यक्तींच्या आसपास अजिबात जाऊ नका.
  • कोणाशीही हस्तांदोलन करू नका किंवा गळाभेट घेऊ नका.
  • सध्या नियमित तपासणीसाठी देखील रुग्णालयात जाऊ नका. आवश्यक असल्यास
  • गर्दीच्या ठिकाणी, जसे उद्याने, बाजारपेठा आणि धर्मिक स्थळे-अजिबात जाऊ नका.
  • अगदी अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा अजिबात बाहेर जाऊ नका.
  • थोड्या थोड्या वेळाने आपले हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवा.

प्रतिकारशक्ती वाढवावी
वयोमानानुसार ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, अनेक ज्येष्ठांना मधुमेह, उच्चरक्तदाब, किडनीशी संबंधित विविध आजार, दमा किंवा श्वसनाशी संबंधित विकार असतात. त्यासोबतच, ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास, तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि अनेकदा त्यात जीव जाण्याचीही भीती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.