Ghorpadi Accident : नातवंडांना कपडे घेण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण; एसटीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

मे महिना संपत आला. शाळेची सुट्टी संपणार म्हणून हैदराबादहून आलेल्या नातवंडांना मॉलमध्ये नवीन कपडे घेण्यासाठी जाणाऱ्या आजीला मात्र आज मृत्यूने चौकात गाठले.
Kusumlata Pande
Kusumlata Pandesakal
Updated on

घोरपडी - मे महिना संपत आला. शाळेची सुट्टी संपणार म्हणून हैदराबादहून आलेल्या नातवंडांना मॉलमध्ये नवीन कपडे घेण्यासाठी जाणाऱ्या आजीला मात्र आज मृत्यूने चौकात गाठले. तिचे नवीन कपडे घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. स्वतःचा जीव जात असताना आजीने मात्र नातवाचा जीव वाचवला आहे. सोलापूर रस्त्यावर आज सकाळी काळूबाई चौकात रस्ता ओलांडताना ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला, तर नातू कार्तिक गंभीर जखमी झाला आहे.

कुसुमलता रामनवल पांडे (वय ६४, रा. सुरेंद्र कॉर्नर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळी साडेदहा वाजता बी. टी. कवडे रस्त्याहून रिक्षा करून आजी, आजोबा आणि दोन नातवंडे काळूबाई चौकात पोहोचले. रिक्षाचालकाने चौक ओलांडून पुढे जाण्यास नकार दिल्याने चौघे जण पायी ९३ अव्हेन्यू मॉलकडे जाण्यासाठी सोलापूर रस्ता ओलांडत होते.

अचानक सिग्नल सुटला काही क्षणात एसटी बस पुढे आली. हे पाहताच आजीने नातवाला पुढे ढकलून दिले. त्यामुळे तो बचावला. मात्र बसची धडक ज्येष्ठ महिलेला बसली. तेथील लोकांनी कुसुमलता पांडे यांना इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एसटी बसचे वाहनचालक विजय बाळू भोरकडे (वय ५३ वर्षे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे बी. टी. कवडे रस्त्यावरील जुन्या पुलावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या वीस वर्षांत पहिल्यांदा या पुलावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

रस्ता ओलांडताना सुविधांचा अभाव

काळू चौक येथे ऐंशी फूट सोलापूर रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसाठी कोणतीही सुविधा नाही. बी. टी. कवडे रस्त्याहून वानवडीकडे जाणाऱ्यांना अनेक वेळा बेशिस्त वाहनचालकामुळे समस्या निर्माण होते. चौकात वानवडीच्या बाजूला मोठा मॉल आहे.

विशेषतः घोरपडी परिसरातील नागरिक मॉलमध्ये जाण्यासाठी पायी रस्ता ओलांडतात. कारण काळूबाई चौकातून रिक्षा मॉलकडे जात नाहीत. रिक्षाचालकांना पुन्हा थांब्यावर येण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर वळून यावे लागते. यासाठी अनेकदा प्रवाशांना चौकात सोडतात. त्यामुळे लहान मुले व वृद्ध रस्ता ओलांडताना दिसतात. याआधी येथे किरकोळ अपघात झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.