Pune Airport OLS Survey : पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी ‘ओएलएस’ सर्व्हेला हिरवा कंदील

सद्यःस्थितीत पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २ हजार ५३५ मीटर (८ हजार ३१६ फूट) आहे. तर रुंदी ४५ मीटर आहे. धावपट्टीच्या पूर्व बाजूला ५०० मीटर व पश्चिमेला ३०० मीटर जागेची आवश्यकता आहे.
Pune Airport OLS Survey
Pune Airport OLS SurveySakal
Updated on

Pune News : पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या ओएलएस (ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस) सर्वेक्षणाला सोमवारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली. याचे आदेश मिळताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होईल. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात धावपट्टी वाढविण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र त्याला यश आलेले नव्हते. राज्य सरकारने याला मंजुरी दिल्यानंतर धावपट्टीच्या कामाला वेग आला. विमान वाहतूक मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी धावपट्टीप्रकरणी लक्ष घातले.

पुणे विमानतळावर मोठे विमान उतरण्यासाठी व पुण्याहून अमेरिका, युरोपसाठी विमान सेवा सुरु होण्यासाठी धावपट्टीची लांबी व रुंदी वाढविणे आवश्यक आहे. धावपट्टी वाढल्यानंतर पुणे विमानतळ खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे.

Pune Airport OLS Survey
Pune Airport : धावपट्टीचा होणार ‘ओएलएस’ सर्व्हे;पुणे विमानतळ,मंत्री मोहोळ घेणार राजनाथ सिंह यांची भेट

८०० मीटरने वाढणार धावपट्टी

सद्यःस्थितीत पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २ हजार ५३५ मीटर (८ हजार ३१६ फूट) आहे. तर रुंदी ४५ मीटर आहे. धावपट्टीच्या पूर्व बाजूला ५०० मीटर व पश्चिमेला ३०० मीटर जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारने ८०० मीटर जागेच्या संपादनाला यापूर्वीच मंजुरी दिली.

८०० मीटरने धावपट्टी वाढली तर पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी सुमारे १० हजार ९४० फूट इतकी होणार आहे. सुमारे ११ हजार फूट धावपट्टी झाल्यास मोठी विमानेदेखील पुणे विमानतळावर उतरू शकतील. जागेच्या संपादनासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Pune Airport OLS Survey
Pune Porsche Accident : अपघाताची केस फास्ट ट्रॅकवर अन् 20 लाखांची मदत; पीडित कुटुंबांना मुख्यमंत्र्यांनी दिलं हे आश्वासन

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या ओएलएस सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्वेक्षण होऊन धावपट्टी वाढविण्याच्या कामाला सुरुवात होईल. धावपट्टी वाढल्यावर मोठ्या विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होईल. यामुळे पुणे शहराचा विकास होण्यासाठी मदत होईल.

- मुरलीधर मोहोळ, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री.

ओएलएस सर्वेक्षणाबाबत आदेश प्राप्त होताच भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्य शासनाकडून माझ्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.