Pune : परिश्रमाने बारामतीच्या ओमने मिळविले दहावीत 95 टक्के गुण...

घरची परिस्थिती बेताची असूनही नौदलामध्ये जाऊन देशसेवेचा ध्यास घेतलेल्या बारामतीच्या ओम दत्तात्रय कळसाईत
ओम दत्तात्रय कळसाईत
ओम दत्तात्रय कळसाईतsakal
Updated on

Pune : घरची परिस्थिती बेताची असूनही नौदलामध्ये जाऊन देशसेवेचा ध्यास घेतलेल्या बारामतीच्या ओम दत्तात्रय कळसाईत या विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत 95 टक्क्यांचा टप्पा गाठला. आई रेखा या शिवणकाम करतात तर वडील दत्तात्रय हे एका कंपनीत नोकरीस आहेत. कळसाईत या दांपत्याची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. मुलाला याची जाणीव असल्याने त्याने मन लावून अभ्यासाचा ध्यास घेतला होता.

आठवीमध्ये त्याला त्यांच्या हुशारीमुळे शिष्यवृत्तीही मिळालेली होती. दररोज पहाटे साडेचारला उठून स्वताःचा नाश्ता स्वताः करुन अभ्यासाला बसायची ओमला सवय होती. पाचवीपासून ओम हा बारामतीतील रयत शिक्षण संस्थेच्या आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकत होता.

ओम दत्तात्रय कळसाईत
Pune News : खरे हिंदू जिजाऊ अन् फुले; पुण्यातील कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांचं विधान

त्याला सर्वच विषयात उत्तम गुण मिळाले असून त्याची टक्केवारी 95 पर्यंत गेली. आई वडीलांचे दोघांचेही त्याला कायमच प्रोत्साहन होते, त्या मुळे त्यानेही परिश्रम करुन गुण प्राप्त केले. जिद्द असेल तर यश मिळू शकते याचे ओम हा एक उदाहरण आहे. आपल्या गुणांबद्दल त्याला जबरदस्त आत्मविश्वास होता.

ओम दत्तात्रय कळसाईत
Pune Accident: दुर्दैवी! पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून एकोणीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

परिक्षा संपल्यावर त्याने आईला मला 95 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळूच शकत नाही असे सांगितवे होते. नौदलात जाऊन देशसेवेचा त्याचा ध्यास असून त्या दृष्टीने एनडीए मध्ये जाण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.