Pune News : दिवाळी सणाच्या निमित्ताने पश्चिम हवेलीतील शेतकऱ्यांना घरपोच साखर वाटप

पहिल्या दिवशी जवळपास ३३० शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली.
on occasion of diwali festival distribution of sugar at home to farmers of Paschim Haveli sant tukaram sugar factory
on occasion of diwali festival distribution of sugar at home to farmers of Paschim Haveli sant tukaram sugar factorySakal
Updated on

धायरी : दिवाळी सणाच्या निमित्ताने संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने   धायरी, खडकवासलासह पश्चिम हवेलीतील सभासद शेतकऱ्यांना घरपोच साखर वाटप करण्यात आली. धायरी येथे जेष्ठ किर्तनकार ह.प.भ.  चंद्रकांत महाराज वांजळे तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग चव्हाण , साखर कारखान्याचे संचालक अंकुश उभे आदींच्या हस्ते शेतकऱ्यांना साखर वाटपास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी जवळपास ३३० शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काकासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट, प्रविण शिंदे , माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दमिष्टे,मिलिंद पोकळे, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते. श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले,कारखान्यात जाऊन साखर आणणे या  भागातील शेतकऱ्यांना गैरसोयीचे होते.शेतकरी सभासदांना साखर कारखान्याने  घरपोच साखर वाटप केल्याने गैरसोय दूर झाली आहे. यावेळी कारखान्याचे संचालक उभे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.