पुणे : धावत्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना सोलापूर महामार्गावरील हडपसर परिसरात शुक्रवारी (ता. ९) सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत बसमधील प्रवासी आणि वाहनचालक सुखरूप बचावले..हडपसर येथील कदम बाग वस्तीलगत सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागली. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली. त्यानंतर सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. या घटनेची अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षात माहिती मिळताच तातडीने हडपसर आणि पीएमआरडीए येथून अग्निशामक बंब रवाना करण्यात आले. खासगी बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. .PMPML CNG Bus Fire : कात्रज चौकात पीएमपीच्या सीएनजी बसला आग.त्यावेळी जवानांनी बसमध्ये कोणी आहे का, याची खात्री करून पाण्याचा मारा करत सुमारे २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नसून, बसमधील १४ प्रवासी व वाहनचालक सुरक्षित आहेत. आगीमध्ये बस पूर्ण जळाल्याने प्रवाशांचे सामान आणि डिक्कीमधील एक दुचाकी जळून खाक झाली.आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप, जवान बाबा चव्हाण, अनिकेत तारु, अविनाश ढाकणे, रामदास लाड, पीएमआरडीएचे वाहनचालक संदीप शेळके, जवान लक्ष्मण मिसाळ, आकाश राठोड, सूरज इंगवले, संकेत कुंभार यांनी प्रयत्न केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.