उरुळी कांचन, ता. १४ : रिंगरोडच्या व्यवहारातील पैशाच्या वादातून स्थानिक उद्योजकाने दोन तरुणांवर गोळीबार केल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या कोरेगावमूळ परिसरातील इमानदारवस्ती येथे शनिवारी (ता. १४) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून दुसरा तरुण थोडक्यात बचावला आहे.