पुणे - भारतीय सशस्त्र सेनेच्या (Army) तीन्ही दलांसह वैद्यकीय विभागात (Medical Department) एक लाख २१ हजाराहून अधिक पदे रिक्त (Empty Post) असल्याचे राज्यसभेतील चर्चेतून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक रिक्त जागा या सैन्य दलाच्या (भूदल) असून, यामध्ये ९० हजार ६४० सैनिकांच्या तर सात हजार ९१२ अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. राज्यसभेत खासदार नीरज डांगी यांच्या प्रश्नाला संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तर दिले. त्यात ही बाब समोर आली. (One lakh Twenty Three Thousand Posts Vacant in the Army)
भारतीय सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय विभागामध्येही दोन हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत. लष्करामध्ये पदोन्नतीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, रिक्त जागा भरणे, तसेच लष्करातील नोकरीकडे तरूणांना आकर्षीत करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत. अशी माहिती डांगी यांनी लेखी उत्तरात दिली आहे. देशातील तरुण-तरुणींना लष्करात सामील करून घेण्याकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये सातत्याने मार्गदर्शन आणि व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) शिबिरांचे आयोजन करत प्रोत्साहित केले जात आहे.
तिन्ही दलांमध्ये अधिकारी पदांसाठी विविध योजनांतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने लष्करातील मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरीही कित्येक जागा रिक्त आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने उमेदवार लष्करातील विविध प्रवेश प्रक्रियांचे अर्ज भरतात, लेखी परिक्षा देतात. परंतु काही उमेदवारांचीच निवड होत असून बहुतांश तरुण लष्करा ऐवजी खासगी क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
लष्करातील रिक्त पदांची संख्या
दल अधिकारी मिलटरी नर्सिंग ऑफिसर जेसीओ/ओआर/एअरमेन/नाविक
सैन्यदल ७९१२ ० ९०६४०
हवाईदल ६१० ० ७१०४
नौदल ११९० ० ११९२७
वैद्यकीय विभाग ४४४ ६९३ १२०६
मागील तीन वर्षांत राज्यातील सैनिकांच्या संख्या (अधिकाऱ्यांना वगळता)
वर्ष नौदल हवाईदल सैन्यदल
२०१८ ३९५ १०१ ४३५६
२०१९ ५२० १७८ ४२३८
२०२० २६४ १८७ ३९४१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.