पुणे - शिकायचे आणि मोठे व्हायचे, हा ध्यास उराशी बाळगलेली चौथीतील दीक्षा रोज चार ते पाच किलोमीटरचे अंतर तुडवीत नियमित शाळेत यायची; परंतु कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू झाले; परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने दीक्षाला ऑनलाइन शिक्षण घेणे अशक्य होते. दरम्यान, शाळेने एका संस्थेच्या मदतीने निधी जमा केला आणि दीक्षासारख्या अन्य विद्यार्थ्यांना टॅब्लेटच्या साह्याने घरातूनच शिक्षण घेता यावे, यासाठी ‘होम स्कूलिंग’ उपक्रम सुरू केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गोऱ्हे बुद्रूक या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जवळपास दीडशे विद्यार्थी आहेत. त्यातील जवळपास पन्नास विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाचे साधन नाही. याच शाळेतील दीक्षा जगताप हिचे उदाहरण घ्यायचे झाले, तर तिचे वडील रोजंदारीवर, तर आई घरकाम करते. त्यांच्याकडे साधा मोबाईल आहे. अशीच परिस्थिती अन्य विद्यार्थ्यांची आहे. मग या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण कसे पोचवायचे, या विचारातून शाळेने थिंकशार्प फाउंडेशनच्या मदतीने ‘क्लाऊड फंडिंग’द्वारे साडेपाच लाख रुपयांचा निधी जमा केला. त्यातून ५० टॅब खरेदी केले. सध्या ‘दोन विद्यार्थी एक टॅब’ अशी रचना करून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे, असे शाळेचे सहाय्यक शिक्षक रजनीकांत मेंढे यांनी सांगितले.
टॅबवर शिकायला मजा येत आहे. शाळा बंद असली, तरी शिकता येत असल्याने छान आहे. टॅबद्वारे शिक्षक समोर दिसत असून, ऑनलाइन वर्गात मैत्रिणीही भेटतात. शाळेने दिलेला घरचा अभ्यास पूर्ण झाला, की त्याचा फोटो काढून आम्ही सरांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवितो.
- दीक्षा जगताप, विद्यार्थिनी, इयत्ता चौथी
प्रकल्पाचे फायदे
असा आहे प्रकल्प
गोऱ्हे बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत थिंकशार्प फाउंडेशनच्या मदतीने चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘होम स्कूलिंग’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना टॅब्लेट दिला आहे. यामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त पंधराशे पुस्तके आणि अन्य शैक्षणिक ॲप आहेत. पालघर येथील डहाणू जिल्हा परिषद शाळेत हा प्रकल्प राबविला जात असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष फड यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.