Pune: “येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता.१९) कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. सुपर लॉट एक नंबरच्या गोळा कांद्याला प्रती किलोला ४० ते ४२ रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्यात प्रती किलोचे उच्चांकी बाजार भाव ३० ते ३१ रुपय किलो होते. १९हजार कांदा पिशव्यांची आवक झाली.” अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने नारोडी, घोडेगाव, महाळुंगे पडवळ, रांजणी, निरगुडसर, अवसरी खुर्द, कळंब तसेच शिरूर व खेड तालुक्यातूनही येथे कांद्याची आवक झाली.
शेकऱ्यांच्या समक्ष वजन व बाजारभाव लिलाव पद्धतीने बोली लाऊन अडते कांद्याची खरेदी करतात. कांद्याची योग्य प्रतवारी करून कांदा बाजार आवारात विक्रीसाठी आणावा. असे आवाहन पानसरे यांनी केले आहे.
“मे.इंदोरे ट्रेडिंग कंपनी आडतदार गोरक्षशेठ इंदोरे यांच्या आडत गाळ्यावर शेतकरी नवनाथ बापू पोखरकर, (पिंपळगाव-खडकी) अंजली भिवसेन भोर,(खडकी) व बाळासाहेब नामदेव खिलारी, (भराडी) यांच्या कांद्याला दहा किलोस ४२१ रुपये असा आत्तापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव मिळाला. आवक कमी असल्याने व उत्तर भारतात कांद्याला मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात उच्चांकी वाढ झाली आहे.”
कांद्याचे बाजार भाव प्रती दहा किलो: सुपर लॉट एक नंबर गोळा कांदा ४०० ते ४२१ रुपये, सुपर गोळा कांदा एक नंबर ३८० ते ४०० रुपये, सुपर मिडीयम दोन नंबर कांदा ३३० ते ३८० रुपये, गोल्टी कांदा २५० ते ३२० रुपये, बदला कांदा १५० ते २५० रुपये. सध्या कांद्याचे बाजारभाव यापुढील काळात वाढण्याची शक्यता व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.