Online Vs Traditional : कोणती शिक्षण पध्दती प्रभावी? जाणुन घ्या पालकांचे म्हणणे.

online education vs traditional school education
online education vs traditional school education
Updated on

पुणे, : "ऑनलाइन वर्गाबाबत मुलांमध्ये सुरवातीच्या काळात प्रचंड उत्सुकता होती. मात्र आता गणित, विज्ञान याबरोबरच भाषा हे विषय शिकणेही अवघड जात असल्याचा अनुभव विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात शिक्षण खंडित होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण हा पर्याय ठरू शकतो. परंतु प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेण्याच्या पारंपरिक पद्धतीची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नसल्याचे वास्तव आहे,'' असा अनुभव संतोष पोतदार या पालकांनी सांगितला. 

स्वत: एक व्यावसायिक असणाऱ्या पोतदार याचा मुलगा सध्या घरात राहूनच ऑनलाइनद्वारे शिक्षण घेत आहे. परंतु ऑनलाइनद्वारे शिक्षण घेत असताना शिक्षकांनी शिकवलेल्या पाठाची पुन्हा-पुन्हा उजळणी करून घ्यावी लागत आहे. पालक म्हणून आपल्यालाही तो अभ्यास मुलांकडून करवून घ्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले. म्हणून पोतदार यांच्या पत्नी स्वत: मुलासमवेत ऑनलाइन वर्गात हजेरी लावतात आणि वर्गात शिकवलेले पुन्हा मुलाला समजावून सांगतात.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

राज्यात सोमवारपासून शाळा (इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग) सुरू झाल्या असल्या तरी बहुतांश ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. गेल्या सहा महिन्यात शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यात वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहेत. काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे शिक्षण सुरू आहे. मात्र असे असले तरीही भविष्यात ऑनलाईनऐवजी पारंपरिक शिक्षणच प्रभावी ठरेल असे बहुतांश पालकांना वाटत आहे. 

मुंबईतील गांधी बाल मंदिर हायस्कूलचे शिक्षक समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. ऑनलाइन शिक्षणाबद्दल पालकांची मते जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात "भविष्यात ऑनलाइन शिक्षणच पारंपरिक शिक्षणाची जागा घेऊन अधिक प्रभावी ठरेल का?' असा प्रश्‍न कुलकर्णी यांनी विचारला होता. त्यावर जवळपास 60.6 टक्के पालकांनी "नाही' असे उत्तर दिले आहे. सर्वेक्षणात साडे सहाशेहुन अधिक पालकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यातील 23.8 टक्के पालकांनी "सांगता येत नाही' असे म्हटले आहे.

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेली आकांक्षा पवार सध्या आपल्या दहावीत असलेल्या लहान भावाचा घरात अभ्यास घेत आहे. ती म्हणते,""शाळेमार्फत भावाचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. परंतु दहावीच्या अभ्यासाची व्याप्ती जास्त असल्याने केवळ ऑनलाइन अभ्यासावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे मी स्वतः त्याला शिकवत आहे. ऑनलाइन शिक्षण हे पर्याय म्हणून ठीक आहे; परंतु प्रत्यक्ष शिकविले तरच अभ्यासातील काही संकल्पना व्यवस्थित कळतात, हे नक्की.'' 

ऑनलाइन शिक्षणाबाबत अनुभव कसा आहे? 
- अतिशय चांगला : 14.4 टक्के 
- चांगला ठीक/समाधानकारक : 34.1 टक्के 
- साधारण : 39.2 टक्के 
- वाईट : 6 टक्के 
- अतिशय वाईट : 6.3 टक्के 


सोने, हिरे-मोत्याचे दागिने, दीडशे डॉलर अन् अकरा लाख; कर्वेनगरमधून चोरट्यानं लंपास केलं हो!​

भविष्यात ऑनलाइन शिक्षणच पारंपरिक शिक्षणाची जागा घेऊन अधिक प्रभावी ठरेल का? 
- होय : 15.6 टक्के 
- नाही : 60.6 टक्के 
- सांगता येत नाही : 23.8 टक्के 


ऑनलाइन शिक्षणासाठी प्रति महिना येणारा खर्च 
- 500 रुपये : 60.3 टक्के 
- 700 रुपये : 15.9 टक्के 
- 1,000 रुपये : 15.7 टक्के 
- एक हजार रुपयांपेक्षा अधिक : 8.1 टक्के


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Sharayu Kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.