पुणे मार्केटयार्डात आता 'एवढ्या' वाहनांना प्रवेश अन् दुकान सुरु ठेवण्याची वेळ...

market1.jpg
market1.jpg
Updated on

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ भुसार बाजारात शुक्रवारपासून (ता. 15) दररोज शेतीमाल आणि किराणा माल घेऊन येणाऱ्या 100 गाड्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच बाजारातील दुकाने उघडण्याची वेळ ही सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

बाजार समितीत चेंबरचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे प्रशासक, अधिकारी यांच्यात बुधवारी बैठक पार पडली. यावेळी निर्णय घेण्यात आला. प्रशासक बी. जे. देशमुख, उपसचिव सतीश कोंडे, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबोले, राजेंद्र बाठिया, अजित बोरा, ईश्वर नहार, रायकुमार नहार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, "कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे. बाजारात गर्दी होऊ नये. तसेच पुण्यातील नागरिकांना धान्य कमी पडू नये या दृष्टिकोनातून हे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच बाजारात दुकाने एक दिवसाआड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो रद्द करण्यात येत आहे. भुसार विभागात दुकाने याआधी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत चालू ठेवण्यात येत होती. परंतु त्याचा वेळ वाढवून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत वाढविण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार (ता. 15) पासून होणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

ओस्तवाल म्हणाले, "लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांनी शहरात धान्य आणि किराणा माल कमी पडू दिला नाही. यापुढे अजून सुरळीत व्हावा आणि गर्दी कमी व्हावी याकरिता दुकाने उघडण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीदारांना वेळेच्या अंतराने येता येणार आहे. 


-बाजारात 10660 क्विंटल मालाची आवक 

-गूळ-भुसार बाजारात बुधवारी एकूण 73 गाड्यांमधून 10660 क्विंटलची मालाची आवक झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.