राजगड किल्ल्यावर रोपवे करण्याला विरोध

राजगड किल्ल्यावर रोपवे करण्याला विरोध
Updated on

वेल्हे (पुणे) : छत्रपतींचा सर्वात अधिक सहवास लाभलेला किल्ला गडांचा राजा व राजांचा गड किल्ले राजगडाचा सिंहगड करु नका अशी मागणी करत स्थानिकांसह, शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज, राष्ट्रसेवा समुह धायरी, दुर्गतटक्षक संघटना, बारागाव मावळ आदीसह राज्यभरातील अनेक संघटनांनी राजगडच्या रोपवेला विरोध केला आहे. राजगडावरील रोपवेसाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच मंजुरी दिली असून या पार्श्वभूमीवर शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम, दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे पप्पु लिपाणे विकास साळुंखे आदींनी राजगड पायथा मार्गासनी येथे काल (ता. १४) रोजी पत्रकार परिषद घेऊन किल्ल्याच्या रोपवेसाठी विरोध केलेला आहे. गरज पडल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील केले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

किल्ले राजगडाचे सौंदर्य हे त्याच्या बेलागपणात आणि रांगड्यापणात आहे, जो धंधेवाईकपणा किल्ले सिंहगड व रायगडावर झाला तो महाराजांच्या पहिल्या राजधानी किल्ले राजगडावर नको. पहिला राजगडवर इतर स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पायवाट दुरुस्ती अशा अनेक दुरुस्ती करा अद्यापही गडावर अनेक दुरुस्ती कामे बाकी असताना हा रोपवेचा घाट कशासाठी याला विरोध करत सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्ट तयार करण्यात आल्या असून याला राज्यभरातील अनेक संघटनांनी रोपवे ला विरोध केला आहे. किल्ले राजगडावर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याची स्वप्ने पाहत अनेक मोहीमा फत्ते केल्या असून स्वराज्याचा राज्यकारभार पंचवीस वर्ष किल्ले राजगडावरुन यशस्वी पार पाडला. राजगड हा अतिशय पवित्र दुर्ग असून महाराष्ट्रासह शिवप्रेमींचे दैवत किल्ले राजगड आहे. किल्ल्याचे पावित्र्य रोपवे मुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे पर्यटक त्यांना किल्ल्याच्या द-या खो-यातुन गेल्याशिवाय इतिहासाचे पराक्रम, मोहीमा कशा समजणार, तसेच किल्ले राजगडावर रोपवे झाल्यास पर्यटन स्थळ म्हणुन त्याचा वापर केला जाईल. हौसे नवसे किल्ल्यावर जातील मद्दयधुंद अवस्थेत किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आणतील. महाराजांनी बांधलेला किल्ले राजगड आजही मोठ्या दिमाखात इतिहासांची साक्ष देत आहे.अशी ऐत्याहासिक वास्तू रोपवे मुळे नष्ट करु नका अशी मागणी यावेळी संस्था व संघटनांनी केली आहे. या राजगडाच्या रोपवेसाठी आमचा विरोध असुन प्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील आम्ही करणार आहोत अशी माहीती यावेळी कदम यांनी दिली. यावेळी शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम,दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे पप्पु लिपाणे विकास साळुंखे उपस्थित होते.

राजगड किल्ल्यावर रोपवे करण्याला विरोध
पुणे : भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर कोऱ्हाळेतील मुकुल इंगळे

दुर्गराज राजगड हा हिंदुस्थानानातील तमाम शिवप्रेमींचे श्रध्दास्थान असून रोपवेला आमचा पूर्ण विरोध राहील.

-महेश कदम अध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान कात्रज

राजगडावर रोपवे झाल्यास किल्ले राजगडचा सिंहगड होऊन येथे चंगळवाद निर्माण होईल हौशी पर्यटक जाऊन किल्ल्यावर अनैतिक गोष्टी सुरु होतील त्यामुळे आमचा रोपवेसाठी विरोध आहे.

-राहुल पोकळे, अध्यक्ष राष्ट्रसेवा समुह धायरी

किल्ले राजगडावर अनेक दुर्मिळ, वनस्पती, पशु पक्षी, कीटकांच्या प्रजाती असून रोपवे मुळे यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकेल.

-डॉ. मिलिंद पराडकर, राजगडाचे अभ्यासक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.