Rain : पुणे जिल्ह्यात आज ‘ऑरेंज अलर्ट’;घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसण्याचा इशारा

जिल्ह्यात गुरुवारी (ता. १८) हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे; तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. १७) व्यक्त केला. त्यामुळे जिल्ह्यासाठी गुरुवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला गेला.
Rain
Rain sakal
Updated on

पुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १८) हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे; तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. १७) व्यक्त केला. त्यामुळे जिल्ह्यासाठी गुरुवारी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला गेला.

शहरात बुधवारी आकाश ढगाळ होते, तर तुरळक सरींनी हजेरी लावली. येत्या दोन दिवसांत पुण्यासह मुंबई आणि राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे पुनरागमन होईल. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शुक्रवारनंतर (ता. १९) पुढील दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

कमाल तापमानाचा पारा घसरला

पुण्यात मंगळवारी (ता. १६) कमाल तापमानाचा पारा ३८.४ अंश सेल्सिअस नोंदला होता. शहरात अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा ३७.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. पुढील दोन दिवस कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असले; तरी कोकण, घाटमाथ्यासह राज्यात मॉन्सून सक्रिय आहे. गुरुवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. उर्वरित कोकण आणि पुण्यासह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. १९) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे राहणार आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून कोटा, गुना, नरसिंगपूर, राजनंदगाव, कलिंगापट्टनम ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र कायम होते.

या जिल्ह्यांना इशारा...

  • जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रत्नागिरी

  • जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई,

  • रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर

  • जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : चंद्रपूर, गडचिरोली.

  • विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : परभणी, हिंगोली,

  • नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.