पुणे - सर्व शिक्षण संस्थांमध्ये मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याचा आदेश उच्च शिक्षण संचालनालयाने फेब्रुवारी २०२४ मध्ये दिला आहे. या आदेशानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही केली नसल्यास अशा महाविद्यालयांबाबत विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयांकडून आणि विद्यापीठांकडून काय कारवाई करण्यात आली, याचा अहवाल सादर करावा, असा आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिला आहे.