पुणे : कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात ‘रिसेन्ट अड्वान्सस इन शीट मेटल फॉर्मिंग’ (एसएमएफ २०२२ ) या पदार्थ अभियांत्रिकीतील द्विवार्षिक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शीट मेटल फॉर्मिंग रिसर्च एसोसिएशन आयोजित ही परिषद २१ आणि २२ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पार पडेल. परिषदेचे उदघाट्न टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन - व्यवहार विभागाचे उपाध्यक्ष राजेश खत्री, शीट मेटल फॉर्मिंग रिसर्च एसोसिएशनचे सचिव आणि आयआयटी बॉम्बेचे प्रा. के. नरसिम्हन, यांच्या उपस्थित होईल, अशी माहिती परिषदेचे आयोजक सचिव आणि यंत्र अभियांत्रिकी संकुलाचे प्रमुख प्रा. गणेश काकांडीकर यांनी दिली.
परिषदेला निमंत्रक आयआयटी बॉम्बेचे प्रा. प्रशांत दाते, एमआयटीचे संस्थापक प्रा. प्रकाश जोशी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवी चिटणीस, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखाचे अधिष्ठाता प्रा. प्रसाद खांडेकर उपस्थित राहणार आहे. असोसिएशन हि उद्योग जगतातील अभियंते, शैक्षणिक आणि संशोधन संस्थातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी ह्यांची व्यावसायिक संघटना असून, यातर्फे वर्षभरात देशस्तरावर अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
परिषदेची सुरुवात राजेश खत्री यांच्या रस्किन्हा स्मृती व्याख्यानाने होईल. दोन दिवसीय परिषदेत स्वित्झर्लंड येथील फेडरल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे डॉ. पावेल व्होरा, पोर्तुगाल येथील युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बनचे डॉ. पाउलो मार्टीनस, ऑस्ट्रेलियातील डेकिन विद्यापीठाचे मॅथिस वाईस, जर्मनीतील इर्लान्गटन विद्यापीठाचे मॅरियन मर्कलिन, कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूचे डॉ. कान इनल, ऑटोफोर्म इंजिनीयरिंगचे डॉ. बार्ट कारलीयर आदी उपस्थित राहणार आहे. सहभागासाठी www.smfra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रा. काकांडीकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.