हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५८ वेबिनार मालिकेचे आयोजन

महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शना खाली मालीकेचे प्रथमच आयोजन
 Harshvardhan Patil
Harshvardhan Patilsakal
Updated on

इंदापूर : राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारकमंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसा- निमित्त तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महा- विद्यालयात ५८ वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाची दि.१४ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून हा उपक्रम १५ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.

 Harshvardhan Patil
पुणे : आंबेगावमध्ये अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ,सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शना खाली या मालीकेचे प्रथमच आयोजन करण्यात आले. या वेबीनार मध्ये डॉ.जुगल दोशी, प्रा.बी. एन.शिंदे, प्रा.दत्तात्रय संकपाळ, डॉ.संजय गायकवाड, डॉ.आर.टी. सपकाळ, डॉ. पद्माकर सहारे,डॉ.भास्कर जंगले, डॉ.पराग चौधरी,डॉ.गणेश सोनवणे,डॉ.लहू गायकवाड, डॉ.विजय शिंदे, डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. संजय भोळे,डॉ.विजयकुमार रणपिसे, तुषार शेंडे, डॉ.संतोष परचुरे, डॉ.काझी, डॉ. राजेंद्र साळुंखे, डॉ.विजय केसकर, डॉ. राजाराम गावडे,सीए प्रशांत भिसे, अविनाश जाधव, डॉ.प्रीती पटेल, प्रा. मुशाहिद,प्रा. युवराज फाळके, डॉ.नितीन पाटील,डॉ.नयना निमकर हे मान्यवर सेवादेतआहेत. वेबिनार मध्ये करिअरच्या संधी, शाश्वत शेती व पर्जन्यमान,ई संसाधनांचा वापर,

 Harshvardhan Patil
BRT PMPML साठी आहे कि दुचाकी साठी?; पाहा व्हिडिओ

उद्योग धंद्या मध्ये रसायनशास्त्राचे महत्व,सामाजिकसंशोधन तत्वज्ञान व पद्धतीशास्त्रे, आर्थिक साक्षरता आणि शेअर बाजाराची तोंड ओळख, भारतीय सैन्य दलातील करिअरच्या संधी, उद्योजकते मधूनसमृद्धीकडे,आपत्ती व्यवस्थापन,चित्रपटातून इतिहास दर्शन, सर्प ओळख व जनजागृती, ऑनलाईन परीक्षा समस्या आणि मार्गदर्शन, उर्दू लिपी महत्व, राष्ट्रभाषा का जीवन मैं स्थान, दूरशिक्षणात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे महत्व आदी विषयांवर व्याख्याने होत आहेत. प्रा.संदीप शिंदे,डॉ. शिवाजी वीर, डॉ. भिमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड हे समन्वयक म्हणून काम पहात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()