शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी निमित्त नागरी सत्काराचे आयोजन

१३ ऑगस्टला तिथीनुसार बाबासाहेब शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत.
pune
punesakal
Updated on

आंबेगाव बुद्रुक : शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या वतीने नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली.यावेळी, लोकसभेच्या माजी सभापती व शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. (Pune News)

१३ ऑगस्टला तिथीनुसार बाबासाहेब शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा नागरी सत्कार मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत कोविडचे नियमांचे पालन करून घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर आभासी (व्हर्च्युल ) पद्धतीने अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थिती नोंदविणार असून, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सुमित्रा महाजन आणि पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बाबासाहेबांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

pune
कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा ; सचिन पिळगावकरांची आग्रही मागणी

१५ ऑगस्ट रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवसृष्टी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. समारोह समितीत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर ), भारतरत्न सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, जेष्ठ पत्रकार रजत शर्मा, गायक शंकर महादेवन, उद्योजक अभय फिरोदिया, प्रमोद चौधरी, सकाळ माध्यम समूहाचे प्रतापराव पवार, क्रेडाई पुणे अध्यक्ष अनिल फरांदेसह अनेक नामवंत असल्याची माहिती सुमित्रा महाजन यांनी दिली. सदरील कार्यक्रम आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात पार पडणार आहे.

pune
विरोधकांचे नक्राश्रू, देशाची माफी मागा; केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद

'बाबासाहेबांचा शंभरीनिमित्त सत्कार करत असतानाशिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला कार्यक्रमामुळे बळ लाभेल.

-सुमित्रा महाजन, माजी लोकसभा सभापती

'बाबासाहेबांच्या गौरवासाठी गठीत केलेल्या सत्कार समारोह समितीच्या वतीने पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

-जगदीश कदम, विश्वस्त महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()