पुणे : रोटरी क्लब ऑफ युवा (Rotary Club of Yuva) आणि सुपरमाईंड (SuperMind)यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘सक्सेस मंत्रा’ (Success Mantra)या मोफत ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाची परिस्थिती आणि दहावीचे वर्ष यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये दडपण आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्याच्या उद्देशाने या सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी युवाच्या अध्यक्षा तृप्ती नानल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी सुपरमाईंडच्या संचालिका अर्चिता मडके, रोटकरी क्लबचे श्रीकांत जोशी आणि दीपा बडवे उपस्थित होते. मडके म्हणाल्या, ‘‘दहावी बोर्डाच्या परीक्षेला अवघे ७० दिवस उरले असून, या कमी वेळात लिखाणाचा सराव, परीक्षेची चांगली तयारी कशी करावी, यासाठी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आले आहे. जानेवारीच्या ८ व १५ या दोन शनिवारी ही दोन सत्रे होणार असून बोर्डातील तज्ज्ञ यात सर्वांचे मार्गदर्शन करणार आहेत. सत्राचे उद्घाटन शनिवार (ता. ८) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education)अध्यक्ष शरद गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर गणित विषयाच्या एसएससी बोर्ड सदस्या डॉ. जयश्री अत्रे प्रमुख मार्गदर्शन करतील.’’या सत्रात सहभागासाठी विनामूल्य नोंदणी https://bit.ly/3JKBnma या संकेतस्थळावर करता येईल.(Pune news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.