Osho Ashram: 'संभोग से समाधी' ओशो आश्रमात नक्की काय चालतं? HIV टेस्टशिवाय...

या आश्रमात नक्की काय चालतं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना?
Osho Temple
Osho TempleSakal
Updated on

ओशो रजनीश आश्रमाबद्दल अनेकांना कुतुहल असतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून या आश्रमात ओशोचे अनुयायी येत असतात. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांनीही सर्वकाही सोडून ओशोच्या आश्रमात अनेक वर्षं घालवली. असं काय आहे या आश्रमामध्ये? संभोग से समाधी हे तत्व सांगणाऱ्या ओशोच्या आश्रमात नक्की असं काय घडतं, ज्यामुळे हा आश्रम सतत चर्चेत असतो. जाणून घ्या...

Osho Temple
धक्कादायक ! नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यात लैंगिक प्रशिक्षण देण्याचा प्रकार उघड

पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात २८ एकर जागेत ओशो आश्रम आहे. १९७४ मध्ये हा आश्रम बांधण्यात आला. या आश्रमात गवताचे गालीचे, संगमरवरी दगडावर कोरलेलं नक्षीकाम, स्विमिंग पूल असं आकर्षक दृश्य पाहायला मिळतं. पण या आश्रमाचे काही नियम आहेत. या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे नियम पाळणं बंधनकारक असतं. कोणतेय आहेत हे नियम?

१. HIV चाचणी - या आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य गेटवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. HIV चाचणीसाठी हे सँपल घेतलं जातं. त्यानंतर आश्रमात प्रवेश दिला जातो, सोबत एक ओळखपत्रही दिलं जातं.

२. गणवेश - या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाल आणि पांढऱ्या रंगाचा एक गणवेश दिला जातो. आश्रमात राहत असताना हाच ड्रेस परिधान करणं बंधनकारक आहे. आश्रमाबाहेरही हा गणवेश मिळतो.

३. राहण्याची सोय - आश्रमात राहण्यासाठी ६ ते १० हजार रुपये भाडं प्रतिदिन भरुन तुम्हाला खोली मिळू शकते. याशिवाय तुम्ही आश्रमाबाहेरच्या एखाद्या हॉटेलमध्येही राहू शकता.

आश्रमात प्रवेश केल्यावर इंडक्शन कार्यक्रम असतो. त्यानंतर आश्रमाला फेरफटका मारला जातो. मोकळ्या जागेत जेवण आणि नाचगाण्याचा कार्यक्रम होतो. याशिवाय ध्यानधारणा, ओशोंच्या आवाजतली काही भाषणंही या शिबिरामध्ये ऐकवली जातात. या आश्रमातलं वातावरणही निसर्गरम्य असतं. कृत्रिमरित्या बनवलेले झरे, हिरवळ, झाडी, बांबूची वनं यामुळे तिथलं वातावरण प्रसन्न आणि शांत असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.