Otur News: वनविभागाकडून २४ तासांच्या आत बिबट्या जेरबंद!

Otur News:  वनविभागाकडून २४ तासांच्या आत बिबट्या जेरबंद!
Updated on

Junnar News: जुन्नर येथील डुंबरे मळा परीसरात ड्रोनने पहाणी करून लावलेल्या पिंजर्‍यात २४ तासाच्या आत बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

मागील चार दिवसा पूर्वीच ओतूर गावच्या हद्दीत दातेडुंबरे मळा येथे बिबट्या जेरबंद करण्यात आला होता.त्याच दिवशी रोहोकडी गावात दिवसा ढवळ्या टोमॅटो च्या शेतात फिरताना बिबट्या कित्येक नागरीकांना दिसला.

त्यानंतर बुधवारी सकाळी ओतूर येथील डुंबरे मळा येथे बिबट्या जेरबंद करण्यात आला असून ओतूर व परीसरातील गावात आणि वाड्या वस्त्यावर बिबट्यांची संख्या खूप वाढली असल्याचे दिसून येत आहे.ओतूर मधील प्रत्येक शिवारात बिबट्या दिसत असून प्रत्येक शेतकऱ्यांने शेतात काम करताना व फिरताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

ओतूर व परीसरातील वाड्या वस्त्यावर बिबट्याचे दर्शन हे नित्याचेच झाले असून आधी रात्री शेतात दिसणारा बिबट्या आता घरा जवळ वाड्या वस्त्यांमध्ये दिवसा ढवळ्या दिसू लागला आहे.ओतूर येथील डुंबरे मळा परिसरात शेतकर्याना शेतात दोन मोठे बिबटे व दोन बछडे दिवसा ढवळ्या दृष्टीस पडत होते.

Otur News:  वनविभागाकडून २४ तासांच्या आत बिबट्या जेरबंद!
Otur Forest Range : ओतूर वनपरिक्षेत्रात पुन्हा बिबट्याचं दर्शन; तरस, चिंकारा अन् मोरांची संख्याही वाढली

त्यामुळे शेतकरी येथील बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून वनविभागा कडे मागणी करत होत.त्यातच दोन दिवसा पूर्वी या भागातून एक मोठा इग्लिश कुत्रा बिबट्याने उचलून नेऊन ठार केला.त्या पाश्र्वभूमीवर वनविभागाने सोमवारी रात्री पेट्रोलिंग दरम्यान डुंबरे मळा परीसरात मोका पहाणी करून ड्रोन व्दारे परीसरातील शेतांची पहाणी केली.

असता बिबट्या दिसून आले. त्यामुळे ओतूर वनविभागाने तातडीने या परीसरात मंगळवारी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला या पिजर्यात २४ तासाच्या आत बुधवारी सकाळी बिबट्या जेरबंद झाला आहे.

Otur News:  वनविभागाकडून २४ तासांच्या आत बिबट्या जेरबंद!
Otur News : उदापूरला श्री काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रेनिमित्त फिरते गाडीबगाडाचा थरार

सदर बिबट्याला ओतूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप माणिकडोह बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे.सदर बिबट नर जातीचा असून तो अंदाजे आठ ते नऊ वर्ष वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

या परीसरात बिबट्याची संख्या जास्त असून ओतूर वनविभागाने परत तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे व शेतकरी संतोष डुंबरे यांनी इतर शेतकऱ्यांच्या वतीने व नागरीकां तर्फे केली आहे.

Otur News:  वनविभागाकडून २४ तासांच्या आत बिबट्या जेरबंद!
Otur Forest Range : ओतूर वनपरिक्षेत्रात पुन्हा बिबट्याचं दर्शन; तरस, चिंकारा अन् मोरांची संख्याही वाढली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.