निरगुडसर - पुणे जिल्ह्यातील ११४ खासगी व सहकारी दूध प्रकल्पापैकी अवघ्या ४ दूध प्रकल्पांनी अनुदानसाठीचे प्रस्ताव सादर केले आहेत. तब्बल ११० दूध प्रकल्पांनी दोन महिने उलटले तरी अनुदानासाठी अजून प्रस्ताव दाखल केले नाही, अजून एकही शेतकऱ्याला अनुदान मिळाले नाही मग दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार कधी? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.