टाकाऊ वस्तूंपासून यश कांबळे याने बनविली अफलातून उपकरणे

Yash-Kamble
Yash-Kamble
Updated on

पुणे - वय वर्षे अवघे आठ. सध्या तो तिसरीमध्ये शिकतो. मात्र इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याची त्याची जिद्द कमालीची आहे. आपले ध्येय गाठण्यासासाठी चिमुकला यश कांबळे आपले पंख बळकट करून उत्तुंग भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, छोटे पण महत्त्वपूर्ण ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स मॉडेल्स’ तयार करण्याचा छंद त्याने या वयात जोपासला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरातील उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून, बॅटरीवर चालणारे छोटे फॅन, बल्ब असे अनेक छोटे छोटे ‘इलेक्‍टॉनिक्‍स मॉडेल्स’ यश ने स्वतः तयार केले आहेत. या चिमुकल्या संशोधकाला सतत नवनवीन प्रयोग करण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या पाचव्या वर्षांपासून घरातील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा छंद त्याला आहे.  तो घरात उपलब्ध असलेल्या वस्तू किंवा जुन्या खेळण्याचा वापर करतो. त्याने बॅटरीवर चालणारे लहान पंख्यांची मॉडेल्स, बल्ब, मिनी जनरेटर, सायकलच्या हेडलाईट्‌स असे अनेक छोटे मोठे प्रोजेक्‍ट्‌स केले आहेत.

यासाठी लागणारा अभ्यास, संदर्भ तो इंटरनेटवरून घेतो. इतक्‍या लहान वयात हे सर्व सुचणे त्यावर अभ्यास करणे, त्यासाठी लागणारी सामग्री स्वतः उपलब्ध करून ती गोष्ट प्रत्यक्षात आणणे आम्हाला देखील अचंबित करणारे आहे. त्याने तयार केलेल्या वस्तूंबाबत तांत्रिकदृष्ट्या फारशी माहिती योग्य शब्दात देता येत नाही. मात्र वापरलेल्या वस्तूंच्या क्षमता काय आहेत आणि त्याचा वापर योग्यरित्या कसा करता येईल याची माहिती न चुकता देतो, असे यशचे बाबा संतोष कांबळे यांनी सांगितले.

इंटरनेटद्वारे कोणतीही माहिती सहज उपलब्ध  होते. त्याचा योग्य वापर करणे आपल्या हातात आहे. इंटरनेटची उपयुक्तता समजून, हवी ती गोष्ट निर्माण करू शकतो, याची यशमधील समज प्रशंसनीय आहे. मुलांच्या शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर करणे ही काळाची गरज तर आहेच; परंतु त्याचा अमर्यादित वापर कसा टाळता येईल हे देखील महत्त्वाचे आहे.
- स्वाती कांबळे, यशची आई

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.