पुणे : कोरोनाबाधितांची (Corona Positive0 वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा(Oxygen) विस्कळित होणारा पुरवठा लक्षात घेऊन पुणे महापालिकेने(PMC) दळवी हॉस्पिटलमध्ये (Dalvi Hospital)अवघ्या दोन आठवड्यांत ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट(oxygen generating Plant) उभारला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ(Mayor Murlidhar Mohol) यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरवात झाली असल्याची माहिती त्यांनी बुधवारी दिली. (Oxygen plant set up by Pune Municipal Corporation_
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘दळवी हॉस्पिटलसह नायडू, नवीन आणि जुने बाणेर हॉस्पिटल असे शहरात सात ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा होत नाही. दळवी हॉस्पिटलमध्ये १३० ऑक्सिजन बेड आहेत. सद्यःस्थितीत या हॉस्पिटलमध्ये २२०० किलो प्रतिदिन (१२ ते १५ यूरा सिलिंडर्स) प्रमाणे ऑक्सिजनचा वापर आहे. हॉस्पिटलमध्ये प्रतिबेड १० लिटर प्रति मिनिटनुसार सुमारे १७०० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटची आवश्यक होती.
महापालिका हद्दीतील आरोग्ययंत्रणा अधिकाधिक सक्षम करत आहोत. त्यामध्ये प्रत्यक्ष रुग्णालय साकारणे, वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करणे, अधिकाधिक बेड तयार करणे, यासाठी निधी कमी पडू देणार नाही.’’ या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, कुणाल खेमनर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.