पुणे - महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून काम केले, राज्यात साधूंची हत्या झाली, कोरोनामध्ये लोकांना सुविधा पुरविण्याऐवजी या काळात भ्रष्टाचार फोफावला होता. गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले.
हे सरकार अकार्यक्षम असल्याने महाराष्ट्राचा विकास मंदावला. राज्यात पुन्हा अशी स्थिती ओढवू नये यासाठी राज्यातील जनता महायुतीला पुन्हा एकदा संधी देईल, असा विश्वास केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केला.