पालखी सोहळ्याचा निर्णय लवकरच

Palkhi
Palkhi
Updated on

पुणे - देहू, आळंदी पालखी सोहळ्याचे नियोजन आणि त्याचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित बैठकीत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे आदी या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम 
सोशल डिस्टन्सिंग’ बाबत नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती, संभाव्य स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण पाहता दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात येईल. सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.