MSEDCl : पालखी सोहळ्यांसाठी ‘महावितरण’ सज्ज; सुरळीत वीजपुरवठ्यासाठी १७५ अभियंते, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Pandharpur Wari 2024 : पालखी मार्गावर पुणे परिमंडलअंतर्गत वीजसुरक्षा व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यात येणार आहे.
Pandharpur Wari 2024
Pandharpur Wari 2024Sakal
Updated on

Pune : संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पालखी मार्गांवर सुरळीत वीजपुरवठा व वीजसुरक्षेसाठी ३५ अभियंता व १४० कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती केली आहे. पालखी मार्गावर पुणे परिमंडलअंतर्गत वीजसुरक्षा व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यात येणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पुणे परिमंडलअंतर्गत भोसरी, पिंपरी, रास्ता पेठ, राजगुरुनगर व मुळशी विभागांच्या कार्यक्षेत्रात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवार (ता. ३०) ते मंगळवारदरम्यान (ता. २) जाणार आहे.

या विभागांतील पालखी मार्गांवर, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्रे व इतर साधनसामग्री तयार ठेवली आहे. वीजसुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केली आहे. आवश्यक ठिकाणी मोबाईल ट्रॉन्सफॉर्मरद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याबरोबरच पिण्याचे पाणी, फळ, अल्पोपाहार आदींची सेवा देण्यात येणार आहे.

Pandharpur Wari 2024
Pune illegal Pubs : पुणे महापालिकेची महिनाभरात १४० रेस्टॉरंट, पबवर कारवाई

पालखी सोहळ्यात महावितरणकडून वीजसुरक्षेचा विशेष व प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती पत्रके, दृक्‌-श्राव्य माहितीपट, छोटेखानी प्रदर्शनी, वीजसुरक्षेबात संवाद, प्रात्यक्षिक आदींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे.

तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक...

पालखीमार्गावर किंवा मुक्कामादरम्यान कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे. वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्स किंवा अन्य ठिकाणच्या वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. वीजविषयक कोणतीही तक्रार असल्यास २४ तास सुरू असलेल्या १९१२/१८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

Pandharpur Wari 2024
ACB At Pune RTO : ‘लाचलुचपत’ची कुणकुण; सर्व कामे कायदेशीर, लायसन्स विभागात ‘मार्किंग’ करणारा गायब

पालखी सोहळ्यांचे स्वागत करण्यासाठी ‘महावितरण’ सज्ज आहे. सोहळ्याच्या कालावधीत सुरळीत वीजपुरवठ्यासह भाविकांच्या वीजसुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेण्यात येईल, तसेच मागणीप्रमाणे तात्पुरती वीजजोडणीही तत्काळ उपलब्ध होणार आहे. वीजसेवेबाबत काही अडचणी असल्यास अभियंता, कर्मचारी किंवा महावितरणच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.